bodybuilders sakal
मुंबई

मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेसाठी अलिबागमधील तीन बॉडी बिल्डर्सची निवड

आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधीत्व करणार

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : शरीर सौष्ठव स्पर्धेत अलिबागचे नाव आता उंचावू लागले आहे. जिल्हा राज्य, पातळीवर या स्पर्धेत अलिबागमधील स्पर्धेत चमकत असताना आता आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत चमकत आहे. त्यामुळे अलिबागचे नाव साता समुद्रपार चमकु लागले आहे. मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेसाठी अलिबागमधील तीन बॉडी बिर्ल्डसची निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी ते तिघेजण भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. 15 व 17 एप्रिल रोजी होणाऱ्या स्पर्धेत यांचा सहभाग असणार आहे.

पुणे येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधत्व करण्याची संधी अलिबाग तालुक्यातील जयेंद्र मयेकर, ऋषिकेश म्हात्रे आणि दिपक राऊळ या तीन बॉडी बिल्डर्सना मिळाली आहे. बॉडी बिल्डर्स अॅन्ड फिटनेस असोसिएशन रायगड तर्फे मिस्टर यनिव्हर्स या आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. ग्रामीण भागात राहणारे अलिबाग तालुक्यातील नागाव येथील जयेंद्र मयेकर यांनी, रायगड श्री, ज्युनिअर मुंबई श्री, महाराष्ट्र श्री, श्रीवर्धन श्री, लायन्स क्लब रायगड श्री बरोबरच चार वेळा मिस्टर इंडिया किताब पटकाविला असून एक वेळा मिस्टर आशिया हा किताबही मिळविला आहे. आज पर्यंत त्यांनी विविध प्रकारचे 22 किताब पटकाविले आहेत. तसेच नागडोंगरी येथील दिपक राऊळ यांनी अलिबाग श्री, नागोठणे संकल्प श्री, रायगड श्री, भारत श्री, अशा एकूण 22 स्पर्धेांमध्ये सहभाग घेऊन यश संपादन केले आहे. ऋषीकेश म्हात्रे यांनी देखील या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून अलिबाग तालुक्याचे नाव लौकिक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT