Anant Radhika Wedding sakal
मुंबई

Anant Radhika Wedding: अंबानींच्या लग्नात बॉम्बची आफवा, एरोनॉटिकल इंजिनियरला गुजरातमधून अटक

Anant Radhika Wedding: अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे संबंधित एक्स खातेधारकाची अर्थात विरल याची माहिती गोळा केली. त्याचा ठाव ठिकाणा शोधून काढण्यात आला

Chinmay Jagtap

Mumbai Police: अंबानी लग्न सोहळ्यात बॉम्बची अफवा पसरविणाऱ्या तरुणास गुन्हे शाखेने मंगळवारी गुजरात येथून अटक केली. विरल अस रा(२६) असे त्याचे नाव असून तो एरोनॉटिकल इंजिनियर आहे.

शनिवारी रात्री एक्सद्वारे त्याने ही अफवा पसरवली. त्याच्या या संदेशाची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी विवाहस्थळाभोवती सुरक्षा व्यवस्था वाढवली. विवाह स्थळ सुरक्षित असल्याची खातरजमा केल्यानंतर गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्त वार्ता विभाग आणि सायबर पोलीस ठाण्यातील(दक्षिण) अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे संबंधित एक्स खातेधारकाची अर्थात विरल याची माहिती गोळा केली. त्याचा ठाव ठिकाणा शोधून काढण्यात आला. त्याद्वारे पथक वडोदरा येथे धडकले आणि विरलला ताब्यात घेण्यात आले.

विरल घरबसल्या स्काय सिलेक्ट नावाच्या कंपनीसाठी काम करतो. या लग्न सोहळ्यात बॉम्बस्फोट झाला तर काय होईल, यावर मी माझे विचार मांडले होते, मी धमकी दिली नव्हती, असा बचाव विरलने घेतल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, व्हीपीएन नेटवर्कचा वापर करणाऱ्या विरलविरोधात सोमवारी रात्री मुंबई दक्षिण विभागाच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT