high-court.jpg 
मुंबई

जुमा मशिदीत सामूहिक नमाज पठणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय

सुनिता महामुनकर

मुंबई: दक्षिण मुंबईतील जुमा मशीद ट्रस्टने मुंबई उच्च न्यायालयात मशिदीमध्ये सामूहिक नमाज पठणाला परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. पण सध्याच्या कोविड संसर्गामुळे निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने जुमा मशीद ट्रस्टची याचिका फेटाळून लावली आहे. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरु आहे. त्यामुळे दिवसातून पाचवेळा नमाज पठणाला परवानगी द्यावी,  अशी त्यांची मागणी होती. 

जुमा मॉस्क ट्रस्टच्या एक एकर जागेत ७ हजार माणसं नमाज पठणाला बसू शकतात, असा त्यांचा दावा होता. पण सध्या कोविडमुळे एकूण क्षमतेच्या ५० टक्के परवानगी द्या, अशी त्यांची मागणी होती. सुट्टीकालीन न्या रमेश धनुका आणि न्या व्ही जी बिश्त यांच्या खंडपीठाने ही सुनावणी घेतली. "सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. प्रत्येक धर्माला आपले विधी करण्याचा अधिकार आहे. ते विधी महत्त्वाचे आहेत. पण सध्या जनहित, सरकारी आदेश आणि नागरिकाची सुरक्षितता जास्त महत्त्वाची आहे" असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. 

"सध्या मुंबई महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. धोकादायक इशारा देत आहे. त्यामुळे एखाद्या धर्माला अपवादात्मक १५ दिवसांसाठी मागणी मंजूर करता येणार नाही. या क्षणी सरकार कुठलाही धोका पत्करु इच्छित नाही" असे  सरकारी वकिल ज्योति चव्हाण म्हणाल्या.  सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता, याचिकाकर्त्यांना अशा प्रकारे नमाज पठणाची परवानगी देता येणार नाही, असे सांगत  खंडपीठाने याचिका फेटाळली. 

(संपादन - दीनानाथ परब)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT