bombay-high-court. 
मुंबई

...अन् न्यायालयाने ठोठावली सीएम रिलिफ फंडात दहा हजार रुपये भरण्याची शिक्षा

वृत्तसंस्था

मुंबई : कोरोनावरील उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात आहे. अनेक ठिकाणी नागरिकांकडून प्रशासनाला सहकार्य मिळत आहे, तर काही ठिकाणी प्रशासनाच्या कार्यात नागरिकांकडून नाहक अडथळे निर्माण केले जात आहे. कोरोनाबाबत सोसायटी माहिती घेणाऱ्या आलेल्या पथकाच्या कामात व्यत्यय आणलेल्या एका व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला, मात्र त्याला शिक्षा म्हणून मुख्यमंत्री कोरोना सहायता मदतनिधीस दहा हजार रुपयाची मदत करण्याचा आदेश देण्यात आला. 

मार्चमध्ये मीरा रोड पोलिसांनी झफर जमाल खान याला कामात व्यत्यय आणल्याबद्दल ताब्यात घेतले होते. त्याला न्यायमूर्ती भारती डोंगरे यांनी जामीन मंजूर केला, पण त्याचवेळी दहा हजार रुपये मुख्यमंत्री मदतनिधीत देण्यास सांगितले.  झफर राहात असलेल्या सोसायटीत कोरोनाची तपासणी करणारे पथक गेले, त्यावेळी त्यांना काम करण्यास प्रतिबंध केला तसेच नया नगर येथील या सोसायटीतील अन्य रहिवाशांनाही सहकार्य करण्यास प्रतिबंध केला. 

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध सरकारी कामात प्रतिबंध, साथीचे रोग रोखण्याच्या कामात अडथळा आणल्याबद्दल, सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याबद्दल आणि आपत्ती निवारणाच्यावेळी केलेल्या सूचनाचे पालन न केल्याचा आरोप ठेवला होता.  न्यायालयाने आरोपीवर सरकारी आधिकाऱ्यांना लक्ष्य केल्याचा आरोप ठेवता येणार नाही असे म्हटले पण त्याचवेळी अन्य आरोपांबद्दल जामीन देता येतो असेही नमूद केले. कोरोना रोखण्यासाठी देशातील प्रत्येकाकडून साह्य अपेक्षित आहे, त्याच कालावधीत आरोपीने विरोध केला, त्यामुळे त्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत करण्याची सूचना करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi : वैभवसाठी संजू सॅमसनला बळीचा बकरा का बनवताय? माजी खेळाडूचा संतापजनक सवाल...

ऑफिसमध्ये एकाला थंडी तर दुसऱ्याला घाम का येतो? वाचा सेंट्रल एसीच्या या परिस्थितीमागचं खरं कारण

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

आगीत काय जळालं ते राखेलाच माहीत! ‘बोल बोल राणी’च्या ट्रेलरवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट, चित्रपटात सईच्या तीन भूमिका?

Latest Marathi News Live Update : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भीमाशंकर पट्ट्यात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम

SCROLL FOR NEXT