मुंबई

परमबीर सिंग प्रकरणात हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर 'या' दिवशी सुनावणी

- सुनीता महामुणकर

मुंबई: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यातील वसुली वादाबाबत दाखल केलेल्या जनहित याचिकेवर 30 मार्चला सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आज निश्चित केले. तर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सिंग यांना आता उच्च न्यायालयात याचिका करावी लागेल.

सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर आज न्या एस के कौल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. तुम्ही मंत्र्यांवर आरोप केले आहेत आणि मंत्र्यांनी तुमच्यावर आरोप केला आहे. हे प्रकरण गंभीर आहे असे आम्ही मानतो, पण तुम्ही आधी उच्च न्यायालयात याचिका का करत नाही, असा प्रश्न खंडपीठाने विचारला. त्यामुळे आता सिंग उच्च न्यायालयात याचिका करावी लागेल. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सिंग यांनी केली आहे.

सिंग यांची आयुक्त पदावरून उचलबांगडी केल्यानंतर देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले आहेत. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांना देशमुख यांनी शंभर कोटी रुपये हॉटेल चालकांकडून वसूल करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप केला आहे. याबाबत देशमुख यांची चौकशी करावी आणि सिंग यांनी आयुक्त पदावर असताना याचा तपास का केला नाही, हे देखील तपासावे अशी मागणी पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिकेत केली आहे. सीबीआय, ईडी किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेमार्फत हा तपास करावा कारण सरकार कडून निष्पक्ष तपास होणार नाही अशी शक्यता व्यक्त केली आहे. यावर आज न्या एस एस शिंदे आणि न्या मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे उल्लेख करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनीही न्यायालयात जनहित याचिका केली आहे. याप्रकरणी स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. वाझे अटकेत असून उद्या पर्यंत त्यांचा ताबा एनआयएकडे आहे.

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bombay High Court March 30 hearing petitions Parambir Singh Anil Deshmukh

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT