mumbai HC sakal media
मुंबई

ज्योतिष शास्त्राचे कारण सांगत लग्नास नकार

न्यायालयाकडून आरोपीवरील बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा कायम

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार लग्न जुळत नसल्याचे सांगत लग्नास नकार देणाऱ्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. प्रेमसंबंधात असताना लग्नाचे प्रलोभन दाखवून गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीविरोधात बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा कायम ठेवला आहे.

अविषेक मित्रा या आरोपीने उच्च न्यायालयात फौजदारी गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका केली आहे. यावर सोमवारी (ता. २१) न्या. एस. एस. शिंदे यांच्यापुढे सुनावणी झाली. मित्राच्या विरोधात एका महिलेने फिर्याद दाखल केली आहे. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दोघे काम करत असताना प्रेमात पडले. पुढे त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाल्याने महिला गर्भवती राहिली; मात्र आरोपीने लग्नाचे प्रलोभन दाखवत तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्याप्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

न्यायालयाने फटकारले

या प्रकरणात आरोपीचे महिलेसोबतचे वर्तन सुरुवातीपासूनच लग्न नाकारण्यात होते, असे दिसते. त्यामुळे ज्योतिष शास्त्राची सबब देऊन स्वतःचे वचन न पाळण्याचा त्याचा डाव स्पष्ट होतो. म्हणजे तिला फसवून तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. जर त्याचा हेतू शुद्ध असता, तर कोणत्याही सबबीशिवाय त्याने लग्नाला होकार दिला असता, असे म्हणत न्यायालयाने याचिका नामंजूर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT