मुंबई

मुंबईत वाढतोय कोरोनाचा धोका? वाढत्या रुग्णांसाठी पालिका सज्ज, 60 टक्के बेड्स रिक्त

भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईत फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडली. मार्च महिन्यातही गेल्या आठवडाभरात हजाराच्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका सज्ज असून मुंबईतील कोरोना रुग्णसेवा देणाऱ्या रुग्णालयातील जवळपास 60 टक्के बेड्स हे रिक्त असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

सध्या कोरोना रुग्णसंख्या जरी वाढत असला तरी पॉझिटिव्ही रेट हा पॉझिटिव्हिटी रेट नियंत्रणात आहे. अंशत: लॉकडाऊन लावणार नसल्याचे मुंबई पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते. शिवाय, कोरोना रुग्णसंख्या मुंबईत वाढतेय. मात्र, तेवढ्याच प्रमाणात कोरोना चाचण्याही वाढवल्या आहेत. परिस्थिती अजूनही नियंत्रणात असून सद्यस्थितीत 60% पेक्षा जास्त बेड्स रिकामे आहेत आणि व्हेंटिलेटर्स आणि आयसीयूही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.

मिशन बिगिन अगेन नंतर ज्या गोष्टी सुरु झाल्या तेथील गर्दीमुळे ही रुग्णसंख्या वाढतेय. जसे, बाजारपेठा, लोकल, विवाहसमारंभ अशी अनेक कारणे रुग्णसंख्या वाढण्यास कारणीभूत आहेत. त्यामुळे जर लोकांचं सहकार्य नाही मिळालं तर लॉकडाऊनचा विचार करता येईल असेही संकेत अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.

मुंबईत कोविड रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये एकूण 13 हजार 529 कोविड बेड्स आहेत. त्यापैकी 4 हजार 900 बेड्स हे भरलेले आहेत आणि 8 हजार 630 बेड्स हे रिक्त आहेत. तर, डीसीएससी आणि इतर जंबो केंद्र मिळून एकूण 12 हजार 992 बेड्स आहेत. त्यापैकी 4 हजार 693 भरलेले आहेत आणि 8 हजार 299 हे रिक्त बेड्स आहेत. म्हणजेच रुग्णांच्या संख्येपेक्षा रिक्त बेड्सची संख्या ही जास्त आहे. जवळपास 60 टक्के बेड्स हे रिक्त आहेत.
 
50 टक्के आयसीयू बेड्स रिक्त

अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी डॅशबोर्डवर असलेल्या आकडेवारीच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, 50 टक्क्यांपेक्षा जास्त आयसीसू बेड्स रिकामे आहेत. ऑक्सिजन बेड्स 72 ते 75 टक्के रिक्त आहेत. खासगी, सरकारी, पालिका आणि जंबो कोविड केंद्रांची मिळून ही आकडेवारी असून जरी आज ही संख्या वाढलेली दिसली तरी अद्याप कसलीही काळजी करण्याची गरज नाही असे ही काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. 

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Bombay Municipal Corporation ready for beds ICU ventilators

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Action in Pune: अन्न व औषध प्रशासन विभागाची पुण्यात आणखी एक कारवाई; साडेचार लाख रुपयांचा माल जप्त

Pune Water Cut schedule : पुणेकरांसाठी मोठी बातमी! शहरातील पाणी कपातीचे वेळापत्रक जाहीर

३७० रुपयांची बिर्याणी, प्रेतांच्या गुप्तांगांवर विनोद... प्रणित मोरे, हिमांशू आणि डॉ. सेजलवर गुन्हा दाखल; कोणती कलमे लावली?

Tukaram Mundhe Video: ''..त्यांनी माझा इतिहास बघावा, मग धमकी देण्याच्या भानगडीत पडावं'', तुकाराम मुंढेंचा इशारा; व्हिडीओ व्हायरल

Pali News : छायाचित्रणाचा आनंद घ्या, पण ड्रोन उडवून पक्ष्यांचा जीव धोक्यात घालू नका; शंतनू कुवेस्कर यांचा डॉक्युमेंट्रीतून संवर्धनाचा संदेश

SCROLL FOR NEXT