बोर्डी ः मुसळधारेमुळे घरापर्यंत पोहचलेले पाणी.
बोर्डी ः मुसळधारेमुळे घरापर्यंत पोहचलेले पाणी. 
मुंबई

बोर्डी, घोलवड पावसामुळे जलमय

सकाळ वृत्तसेवा

बोर्डी ः बोर्डी, घोलवडमध्ये रविवारी पहाटे पाच ते सकाळी साडेआठपर्यंत बेसुमार बरसलेल्या मेघराजाने परिसर जलमय करून टाकला आहे. गेल्या १५ दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. सर्वत्र पाण्याची पातळी वाढली आहे. तलाव, विहिरी तुडुंब भरले आहेत.

अनेक वर्षांनंतर पाण्याच्या पातळीत झालेली वाढ ही उल्लेखनीय असल्याचे बोलले जाते आहे. त्यातच आज पहाटे पाच ते साडे आठदरम्यान धो-धो बरसलेल्या पावसामुळे बोर्डी, घोलवड गावात पाणीच पाणी झाले आहे.

बोर्डी गावातील वहिंद्रा धुंदिया वाडी, घोलवड गावातील ग्रामपंचायत कार्यालय आणि भाजी मार्केट तसेच सुविधा वसतिगृह परिसरात पाणी भरले. सकाळच्या वेळी कामाला जाणाऱ्यांना पावसाचा चांगलाच फटका बसला. काही काळ वाहतूकही धीमी झाली होती. दरम्यान, साडेआठनंतर पावसाने उघडीप दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT