mumbai corona.jpg 
मुंबई

बोरिवली ते चेंबूर, जाणून घ्या मुंबईतील कोविड-१९ हॉटस्पॉटबद्दल 

दीनानाथ परब


देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. मागच्या २४ तासात महाराष्ट्रात १३,६५९ कोरोनाबाधितांची नोंद झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या डाटानुसार, गुरुवारी देशभरात २२,८५४ कोरोना रुग्णांची नोंद झाली. यातले ६० टक्के रुग्ण एकटया महाराष्ट्रातून येतात. सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्येमध्ये मुंबई राज्यात चौथ्या स्थानावर आहे. बुधवारी मुंबईत १,५३९ कोरोना रुग्णांची नोंद झाली व पाच रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १० मार्च पर्यंत मुंबईत २२७ अ‍ॅक्टिव्ह कंटेन्मेंट झोन होते. यात झोपडपट्टी आणि चाळींचा समावेश आहे. 

- मुंबईत बोरिवलीत कोरोनाचा सर्वात मोठा अ‍ॅक्टिव्ह हॉटस्पॉट आहे. तिथे ८१६ करोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

- अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम आणि विलेपार्ले पश्चिम या भागात सर्वाधिक ३८ सील केलेल्या इमारती आहेत. हा भाग केडब्ल्यू वॉर्डमध्ये येतो. बोरिवलीपाठोपाठ या वॉर्डात ७८३ अ‍ॅक्टिव्ह करोना रुग्ण आहेत. 

- कांदिवली आणि चारकोपमध्ये ७०० अ‍ॅक्टिव्ह करोना रुग्ण असून आतापर्यंतच ५६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या भागात ३१ सील इमारतीआहेत.  

- पी/नॉर्थ वॉर्डमध्ये येणाऱ्या मालाड, मनोरी, मार्वे, अक्सा आणि मढ या भागात ६८८ अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तिथे आतापर्यंत ६५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

- के/इस्ट वॉर्डमध्ये येणाऱ्या अंधेरी पूर्व, जोगेश्वरी पूर्व आणि विलेपार्ले पूर्व या भागात ६८७  अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. इथे पाच कंटेन्मेंट झोन आहेत. 

- मुलुंडमध्ये बुधवारी ६११ अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण होते. बोरिवलीपेक्षा इथे रुग्ण संख्या कमी असली तरी व्हायरसच्या फैलावाचा वेग जास्त आहे. 

- एन वॉर्डमध्ये येणाऱ्या घाटकोपर, विद्याविहार आणि पंत नगरमध्ये ५७५ अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. 

- भांडूप, पवई, कांजूरमार्ग, विक्रोळी आणि नाहूर या एस वॉर्डमध्ये ५७१ अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. इथे सर्वाधिक १० कंटेन्मेंट झोन आहेत. 

- एम/वेस्ट मधल्या चेंबूर, सिंधी सोसायटी, छेडा नगर आणि टिळक नगरमध्ये सर्वाधिक सील इमारती आहेत. या भागात २६ सील इमारती आहेत. इथे ३६२ अ‍ॅक्टिव्ह करोना रुग्ण आहेत. 

महाराष्ट्रातील कोरोना स्थितीबद्दल केंद्रानेही चिंता व्यक्त केली आहे. नागपूरमध्येही लॉकडाउन जाहीर झाला आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

Shirur Crime : पुणे–अहिल्यानगर महामार्गावर थरार; शिरूरजवळ तरुणावर कोयता-तलवारीने जीवघेणा हल्ला!

SCROLL FOR NEXT