मुंबई

VIDEO: बोरीवलीत इमारतीचा स्लॅब कोसळला, सुदैवानं जीवितहानी टळली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- बोरीवलीत शनिवारी रात्री एका इमारतीचा सज्जा कोसळला. सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी टळली आहे. बोरीवली पश्चिम येथील आय.सी. कॉलनीतल्या व्हीला स्टेला या इमारतीत ही घटना घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. घोसाळकर यांनी शिवसैनिकांसोबत मदतकार्यास लगेचच सुरुवात केली. 

त्यानंतर अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्यास सुरुवात केली. या इमारतीतल्या राहणाऱ्या 11 कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. ही घटना बोरिवली प्रभाग 8मध्ये घडली आहे. या घटनेनंतर इमारतीचा वीजपुरवठाही खंडित करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motivational Story: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या; रमाबाईंच्या जिद्दीची सरन्यायाधीशांनी घेतली दखल, संघर्षाची प्रेरणादायी कहाणी..

तुम्हाला मूल्यमापन करण्याची गरज आहे का?

Snake Bite : भोरमध्ये सर्पदंशाच्या घटनांत वाढ; तीन महिन्यांत १३१ घटना, वेळेत उपचारामुळे मृत्यू टळले

Daal Fara Recipe: नाश्त्यासाठी एकदा करून पाहाच! उत्तर प्रदेश-बिहारचा फेमस ‘दाल फरा’; प्रोटीनचा उत्तम स्रोत

Pune News : पुणे शहरात दहीहंडीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० मंडळांवर गुन्हे; ११६ मंडळांवर न्यायालयीन खटले दाखल

SCROLL FOR NEXT