पालघर - लोकलमध्ये आणि स्थानकात जन्मलेली जुळी मुले.
पालघर - लोकलमध्ये आणि स्थानकात जन्मलेली जुळी मुले. 
मुंबई

एकाचा लोकलमध्ये, तर दुसऱ्या मुलाचा स्थानकात जन्म

सकाळवृत्तसेवा

पालघर - नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सफाळ्यातील एका २० वर्षीय महिलेने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे, महिलेने दिलेल्या जुळ्या बाळांपैकी एकाचा जन्म धावत्या लोकलमध्ये, तर दुसऱ्या बाळाचा जन्म पालघर रेल्वेस्थानकातील प्रतीक्षागृहात झाला. धावत्या लोकलमध्ये प्रसूती झाल्यानंतरही दोन्ही मुले आणि त्यांची आई सुखरूप आहे. त्यांना सध्या देखरेखीसाठी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

सफाळे येथील छाया सवरा (२०) या महिलेला मंगळवारी सकाळी प्रसूतीच्या वेदना जाणवू लागल्याने तिला सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, प्रसूतीत काही अडचणी असल्याने डॉक्‍टरांनी तिला पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. वेळ कमी असल्याने तसेच योग्य साधन उपलब्ध नसल्याने महिलेचे पती अंकुश सवरा यांनी तिला लोकलनेच पालघर ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार सकाळी ९ वाजता त्यांनी सफाळेहून पालघर येथे जाण्यासाठी लोकल पकडली; मात्र प्रवास सुरू झाल्यानंतर पालघर स्थानक येण्यापूर्वी महिलेने एका बाळाला जन्म दिला. पालघर रेल्वेस्थानकात लोकल थांबल्यानंतर या घटनेची माहिती पालघर रेल्वे स्टेशन मास्तर यांना देण्यात आली. यानंतर सफाई कर्मचाऱ्यांपासून ते लोहमार्ग पोलिसांपर्यंत सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागली. या वेळी लोकल जवळपास २० मिनीटांपर्यंत स्थानकातच थांबवून ठेवण्यात आली होती. ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्‍टरांना रेल्वेस्थानकात पाचारण करण्यात आले. एका बाळाच्या जन्मानंतरही महिलेला प्रसूतीच्या वेदना होत असल्याने प्रसंगावधान दाखवत सफाई कर्मचाऱ्यांनी तातडीने संपूर्ण प्रतीक्षालय स्वच्छ केले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्‍टरांनी प्रयत्न केल्यानंतर महिलेने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. हे दोन्ही बाळ आणि त्यांची आई सुखरूप असल्याची माहिती या वेळी डॉक्‍टरांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT