File Photo 
मुंबई

...म्हणून केली मुलाने न्यायालयात आईविरोधात याचिका

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचा स्वीकार करण्यास आईने नकार दिल्यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. आईने दुसरा विवाह केल्यामुळे झालेल्या मानसिक छळाबद्दल दीड कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणीही त्याने केली आहे.

याचिकादाराचे वडील व आईचा सुमारे 35 वर्षांपूर्वी विवाह झाला. आपण फक्त अडीच वर्षांचे असताना आईने डेक्कन एक्‍स्प्रेसमध्ये सोडून दिले, असा दावा त्याने केला आहे. त्यानंतर काही काळाने आईने दुसरा विवाह केला. त्यामुळे आपले संगोपन मावशी आणि आजीने केले, असे याचिकादाराचे म्हणणे आहे.

...हा आहे याचिकादाराचा दावा

मोठे झाल्यानंतर खूप मेहनतीने आपण आईचा शोध घेतला. तिच्या कुटुंबाशी आपल्या कुटुंबीयांसोबत भेट घेतली; त्यावेळी आईने आपल्याला मुलगा म्हणून स्वीकारले. परंतु नंतर तिने संपर्क कमी केला आणि मुलगा म्हणून स्वीकारण्यास नकार दिला, असा याचिकादाराचा दावा आहे. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात याचिका केली असून, लवकरच न्या. ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. आईने कायदेशीररित्या आपला मुलगा म्हणून स्वीकार करावा, अशी मागणी त्याने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल वायरवर पाय पडला अन्.., काळाचौकीच्या गणपती मंडपासमोर अघटित घडलं; मध्यरात्री 2 वाजताचा थरारक घटनाक्रम समोर

Asian Games,Cricket: भारतीय संघाचे सलग दुसऱ्यांदा मेडल पक्के! बांगलादेशला पराभूत करत फायनलमध्ये धडक

Mohol Ganesh Mandal Youth Death : गणेश मंडळात चक्कर येऊन 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू; बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर कोसळला अन्..., कार्यकर्त्यांमध्ये हळहळ

Manwat Parbhani Highway Bridge : पुलाचे काँक्रीट निखळले, सळ्याही उघड्या मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी-वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : 'यूपीआय'वरील शुल्काचा पुनर्विचार करा; ग्राहक पंचायतची मागणी

SCROLL FOR NEXT