मुंबई

नेटीझन्स का वापरतायत #BoycottPatanjaliProducts हा हॅशटॅग ?

सकाळ वृत्तसेवा

तुम्ही गोळ्या औषधं खाण्यापेक्षा आयुर्वेदिक औषधांवर भर देत असाल किंवा तुमच्या आसपासची लोकं तसं करत असतील तर ही बातमी सर्वांसोबत शेअर कराच. हरिद्वारच्या आयुर्वेदिक आणि युनानी कार्यालयाने बाबा रामदेव यांच्या पतंजलि  सोबतच देशातील चाळीस टक्के आयुर्वेदिक उत्पादनं निकृष्ट दर्जाची असल्याचं म्हटलंय. माहिती अधिकारात ही बाब उघड झालीये.    

2013 ते 2016 या कालावधीत संकलित केलेल्या 82 नमुन्यांपैकी तब्बल 32 नमुने गुणवत्ता चाचणीमध्ये खरे उतरलेले नाहीत. यामध्ये पतंजलिचं 'दिव्य आमला ज्यूस' आणि 'शिवलिंगी बीज' यांचा देखील समावेश आहे. 

दरम्यान, मागच्याच महिन्यात पश्चिम बंगालमधील मिलिटरी कॅंन्टीन मधील पतंजलिच्या 'दिव्य आमला ज्यूस' चा साठा गुणवत्ता मानांकनात खरा न उतरल्याने जप्त देखील करण्यात आला होता.  

यासंबंधी उत्तराखंड राज्य प्रयोगशाळेत याबद्दलची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये  'दिव्य आमला ज्यूस' मधील विद्राव्य पदार्थांची क्षारता मोजली गेली. यामध्ये  विद्राव्य पदार्थांची क्षारता गरजेपेक्षा कमी आढळली आहे. माहितीच्या अधिकारात पतंजलीच्या 'शिवलिंगी बीज'मध्ये 31.68 % भेसळ आढळली आहे. 

पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांनी या अहवालाचं खंडन केलंय. 'शिवलिंगी बीज' हे एक नैसर्गिक बीज आहे. आम्ही यात भेसळ कशी काय करू शकतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. पतंजलिची प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. पतंजलीच्या या दोन उत्पादनांसोबत इतर 18 आयुर्वेदिक उत्पादने देखील गुणवत्ता चाचणीत निकृष्ट दर्जाची ठरली आहेत.  

गेल्या काही वर्षात आयुर्वेदिक औषधांचं उत्पादन करणारं एक मोठं राज्य म्हणून उत्तरखंडकडे पाहिलं जातंय. हरिद्वार आणि ऋषीकेशमध्ये आयुर्वेदिक औषधांचे हजारो विक्रेते आहेत. अशातच आता याबद्दलची माहिती समजताच नेटीझन्सनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

#BoycottPatanjaliProducts असा हॅशटॅग वापरत याबद्दल आपली मते ट्विटरच्या माध्यमातून मांडण्यास आता सुरवात झालीये. 

WebTitle :  BoycottPatanjaliProducts trending top on twitter

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT