SSC Result
SSC Result 
मुंबई

मेंदूच्या पक्षाघातावर मात करत मिळवले 86 टक्‍के

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : जिद्द, चिकाटी, तसेच यशस्वी होण्याची आकांक्षा असेल तर अशक्‍य ते शक्‍य होऊ शकते, हे म्हसळ्यातील ऋषिकेशने दाखवून दिले आहे. जन्मताच सेरेब्रल पाल्सी' म्हणजे मेंदूचा पक्षाघात आजार असताना त्यावर मात करत त्याने दहावीच्या परीक्षेत 86.60 टक्के गुण मिळवले. त्याच्या या यशाबाबत सर्व स्तरांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

'सेरेब्रल पाल्सी' या आजाराने ग्रस्त असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल- म्हसळा शाळेतील ऋषिकेश शीतल सुदाम माळी या विद्यार्थ्याने दहावी सेमीइंग्रजी माध्यमात 500 पैकी 433 गुण मिळवत उत्तुंग यश प्राप्त केले. तसेच दिव्यांग प्रवर्गात ऋषिकेशने प्रथम क्रमांक मिळवला. आजारपणामुळे ऋषिकेशला पूर्णवेळ शाळेत जाता येत नव्हते. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शाळेतील शिक्षक व प्राचार्य बी. एन. माळी यांना दिले.

9 वी परीक्षेनंतर 10 वी पाठ्यपुस्तकांचे सखोल वाचन, विविध यू-ट्युब चॅनेलवरील मार्गदर्शन, तसेच पाष्टी शाळेतील सर्व शिक्षकांचे घरी मिळणारे मार्गदर्शन, यामुळे परीक्षेत यश मिळवणे सोपे झाल्याचे त्याने सांगितले. अभ्यासाबरोबरच व्यायाम, फिजिओथेरपी, योगासने, आहार व आरोग्याची काळजी, सायकलिंग व नियमित चालणे, गायन इत्यादी बाबींवर कटाक्षाने त्याने मेहनत घेतली. 

स्टिफन हॅंकिंगचा प्रभाव 
इयत्ता 10 वी अभ्यासक्रमातील अरुणिमा सिन्हा, वैज्ञानिक स्टिफन हॅंकिंग यांच्या जीवनावरील वेगवेगगळ्या पुस्तकांमधून जीवनावर प्रभाव टाकल्याचे त्याने सांगितले. तसेच विज्ञानातील "स्टेम-सेल' थेरेपी या आधुनिक उपचाराचा त्याने जानेवारी महिन्यात स्वतः अनुभव घेतला. उपचारांनंतर मार्च महिन्यात थेरपी व सततच्या बसण्यामुळे पाठदुखीने त्रस्त असतानाही सर्व त्रासाशी झुंजत स्वतः हाताने पेपर लिहून यशाचे शिखर गाठले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT