Rahul Narvekar sakal
मुंबई

Mumbai Dabewale : मुंबईचे डबेवाले फीट इंडियाचे ब्रॅण्ड एम्बेसेडर - राहुल नार्वेकर

मुंबईच्या रस्त्यांवर स्वतंत्र सायकल मार्गिका आणि सुरक्षित सायकल पार्किंग सुविधेची मागणी मुंबईतील डबेवाल्यांनी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबईच्या रस्त्यांवर स्वतंत्र सायकल मार्गिका आणि सुरक्षित सायकल पार्किंग सुविधेची मागणी मुंबईतील डबेवाल्यांनी केली आहे.

मुंबई - मुंबईच्या रस्त्यांवर स्वतंत्र सायकल मार्गिका आणि सुरक्षित सायकल पार्किंग सुविधेची मागणी मुंबईतील डबेवाल्यांनी केली आहे. वातावरण फाऊंडेशन यांनी सस्टेनेबल मोबिलिटी नेटवर्कच्या (एसएमएन) माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणातून या बाबी समोर आल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी, सुमारे पन्नासहून अधिक डबेवाल्यांच्या उपस्थित या सर्वेक्षण अभ्यासाचे अनावरण केले. पर्यावरणास पुुरक असे योगदान देणारे मुंबईचे डबेवालेच फीट इंडिया कॕम्पेनचे ब्रँड एम्बेसेडर असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या डबेवाल्यांपैकी ८९% प्रतिसादकर्त्यांनी मुंबईत समर्पित सायकल मार्गिकेची मागणी केली आहे. सायकलसाठी सुरक्षित पार्किंगचा अभाव ही त्यांची सर्वात मोठी चिंता असून सुरक्षित पार्किंग सुविधा गरजेची असल्याचे १०० टक्के प्रतिसादकर्त्यानी सांगितले.

टिफिन डिलिव्हरीसाठी मुंबईतील डबेवाल्यांचे सायकल हे वाहतुकीचे प्राथमिक साधन आहे. मुंबई शहर आणि उपनगरांच्या नऊ भागांमधील ५०० डबेवाल्यांपैकी २२० जणांचे सर्वेक्षण यामध्ये करण्यात आले. सायकलिंगशी संबंधित पायाभूत सुविधांची स्थिती आणि डबेवाल्यांना टिफिन पोहोचवताना येणाऱ्या आव्हानांना समजून घेणे हे या सर्वेक्षणाचे उद्देश होते.

मुंबईतील डबेवाले कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या शहराच्या प्रयत्नांना हातभार लावत आहेत, ही सर्वेक्षणातून समोर आलेली चांगली बाब आहे. सर्व प्रतिसादकर्त्यांपैकी ९२% डबेवाले प्राथमिक वाहतुकीचे साधन म्हणून सायकल वापरतात. डबेवाल्यांचे असे एकच काम आहे या घटकापासून पर्यावरणाला मदत होते. महत्वाचे म्हणजे पर्यावरणाला शाश्वत असे काम डबेवाल्यांच्या माध्यमातून घडत आहे. त्यामुळे डबेवाले हेच खरेखुरे फीट इंडिया कॅम्पेनचे ब्रॅण्ड एम्बेसेडर असल्याचे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.

सर्वेक्षणाअंतर्गत ८६% प्रतिसादकर्त्यांनी डिलिव्हरीसाठी नॉन-मोटराइज्ड ट्रान्सपोर्टचा वापर करण्यावर जोर दिला. सायकलद्वारे केलेल्या डिलिव्हरीमुळे हवा शुद्ध होण्यास नक्कीच हातभार लागेल असे डबेवाल्यांनी नमूद केले. तसेच, इतर लास्ट-माईल वितरण यंत्रणांनी डिलिव्हरीसाठी सायकलची निवड करावी कारण ते पर्यावरण आणि आरोग्यासाठी चांगले आहे, असे ७१% प्रतिसादकर्त्यांनी सांगितले.

'मुंबईतील डिलिव्हरी उद्योगातून होणारे उत्सर्जन कमी करण्यासाठी, मुंबईच्या डबेवाल्यांना मोठ्या प्रमाणात पाठबळाची गरज आहे, असे सर्वेक्षणातून दिसते. सुरक्षित पार्किंगची जागा, सर्वसमावेशक पायाभूत सुविधा आणि समर्पित सायकल मार्गिका ह्यावर सरकारसोबत काम करण्यासाठी डबेवाल्यांसारख्या आणखी केस स्टडीज पुढे येणे गरजेचे आहे. लास्ट माईल डिलिव्हरी उद्योगाने डीकार्बनाइज करण्याची तातडीने गरज असून डबेवाले हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे,' असे वातावरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान केसभट म्हणाले.

रस्त्यावरील रहदारी ही एक मोठी चिंता आहे. ज्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो असे 75 टक्के प्रतिसादकर्त्यांनी सांगितले. रस्ता सुरक्षा ही सर्व सायकलस्वारांसाठी चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

रेल्वे परिसरात पायाभूत सुविधा द्या

लोकल ट्रेन हे डबेवाल्यांच्या वाहतुकीचे दुसरे सर्वात महत्त्वाचे साधन असल्याने, ६८% प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की, रेल्वेच्या पायाभूत सुविधा सायकल समावेशक असायला हव्यात. टिफिनची वाहतूक करण्यासाठी लोकल ट्रेनमध्ये स्वतंत्र वॅगन आणि स्थानकात ये-जा करण्यासाठी रॅम्प उपयुक्त ठरतील, असे डबेवाल्यांनी सर्वेक्षणात सांगितले.

'आमच्यासाठी असे सर्वेक्षण यापूर्वी कधीही झाले नव्हते. सायकलींसाठी पार्किंगची जागा तयार करणे मोटार पार्किंगहुन सोपे आहे. सायकलीचा वापर टिकवून ठेवण्यासाठी सरकार आम्हाला साथ देईल अशी आम्हाला आशा आहे.,' असे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी सांगितले.

बहुतेक डबेवाल्यांच्या मते इंधनाची बचत, रस्त्यांवर चालण्याची सोय, मोटार वाहनांच्या तुलनेत पार्किंगच्या जागेची कमी गरज आणि आरोग्याचे फायदे हे सायकलिंगचे मुख्य फायदे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT