वसई ः वाहन खरेदी
वसई ः वाहन खरेदी 
मुंबई

दिवाळीत वाहन खरेदीला ब्रेक

सकाळ वृत्तसेवा

वसई ः सणासुदीच्या काळात खरेदीकडे बहुतांश ग्राहकांचा कल असतो. त्यातच दिवाळीचा मुहूर्त साधून आवर्जून नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. यंदा मात्र दिवाळीत वसई तालुक्‍यात वाहनांच्या खरेदीला ब्रेक लागल्याचे चित्र आहे. मंदीचे सावट, इंधनात सातत्याने होणारी वाढ आणि खर्च यामुळे ग्राहकांनी वाहनखरेदीकडे पाठ फिरवल्याचे वाहन व्यावसायिकांनी सांगितले.

आज प्रत्येक घरात एक तरी वाहन असते, तरी दिवसागणिक येणारे नवे ब्रॅंड, वाढत्या सोई-सुविधा यामुळे सणावारात आवर्जून वाहनखरेदीला पहिली पसंती दिली जाते. भले रोजचा प्रवास रेल्वे अथवा बसने केला जात असला, तरी शहरातल्या शहरात अथवा जवळच्या प्रवासासाठी स्वतःचे वाहन असावे, अशी अनेकांची इच्छा असते. शिवाय वेळेत कामावर पोहोचण्यासाठी, स्टेशन गाठण्यासाठी रिक्षा, टॅक्‍सीऐवजी स्वतःचे वाहन फायदेशीर ठरते.

मग त्यासाठी ते स्थानकाजवळ उभे करावे लागत असले, तरी बहुतांश जण दुचाकी, चारचाकी स्थानकात उभ्या करून पुढील प्रवास करतात. शिवाय कॉलेज तरुण, महिलावर्गातही वाहनांची चांगली क्रेझ असल्याने दरवर्षी सणावारात मोठ्या संख्येने वाहनखरेदी केली जाते; परंतु यंदा सर्वत्र मंदीचे वारे वाहत असल्याने ग्राहकराजाही काटकसरीकडे वळला असून अनेकांनी वाहनखरेदीला ब्रेक लावल्याचे दिसत आहे. 

वसई, विरार, नायगाव, नालासोपारा भागात मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी व अन्य वाहनांचे शोरूम आहेत. परंतु इंधनात झालेली वाढ आणि होणारा खर्च पाहता यंदा येथून वाहन खरेदी कमी प्रमाणात झाली आहे. उपप्रादेशिक विभागात झालेली नोंदणी पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऑक्‍टोबरपर्यंत ४ लाख ८३ हजार ४६१ रुपयांची घट झाली आहे. दुचाकी, चारचाकीबरोबरच व्यवसायासाठी ट्रॅक्‍टर, रिक्षा, शाळेच्या खासगी बस विकत घेतात.

दिवाळीच्या मुहूर्तावर ही खरेदी होते. यामुळे शोरूम मालकांनादेखील फायदा होतो. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सूटदेखील ठेवली जाते; परंतु या दिवाळीत खरेदी कमी झाली आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या तुलनेत रिक्षा ३०, दुचाकी ४२९, टॅंकर ४३; तर शाळेच्या बसची संख्या २ ने कमी झाली आहे. चारचाकीची संख्या मात्र १३६ ने वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT