Bribe Crime Assistant dairy manager arrested taking bribe of Rs 7 thousand police Corruption
Bribe Crime Assistant dairy manager arrested taking bribe of Rs 7 thousand police Corruption  esakal
मुंबई

Bribe Crime News : ७ हजाराची लाच घेताना सहाय्यक दुग्धशाळा व्यवस्थापकाला अटक

सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : सात हजार रुपयांची लाच घेताना वरळी आरे दुग्धशाळा विभागाच्या सहाय्यक व्यवस्थापक रणजीतसिंग कोमलसिंग राजपूत यांना गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. यातील तक्रारदार नियत वयोमानानुसार आरे दुग्धशाळा विभागातून निवृत्त झाले होते. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर मिळणार्‍या लाभाच्या रक्कमेसाठी महालेखा कार्यालयात एक अर्ज केला होता.

या अर्जानंतर संबंधित कर्मचार्‍यांच्या कागदपत्रांच्या प्रक्रियेत रणजीतसिंग राजपूत यांनी त्यांच्याकडे दहा हजाराची लाचेची मागणी केली होती. लाच दिल्यानंतर त्यांच्या अर्जाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करुन ही फाईल पुढे पाठविली जाईल असे सांगण्यात आले होते. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी रणजीतसिंग राजपूत यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. बुधवारी १९ एप्रिलला या तक्रारीची शहानिशा करण्यात आली होती.

त्यात रणजीतसिंग यांनी लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर तक्रारदार गुरुवारी सात हजार रुपये संबंधित कार्यालयात गेले होते. यावेळी लाचेची ही रक्कम घेताना रणजीतसिंग राजपूत यांना या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. गुरुवारी झालेल्या या कारवाईने कार्यालयातील इतर अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Mother's Day 2024: 'मदर्स डे' निमित्त आईसोबत करा दक्षिण भारतातील 'या' सुंदर ठिकाणांची भटकंती

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये मतदानावरुन वाद

SCROLL FOR NEXT