मुंबई

पालिकेने कसली कंबर; रेमडेसेवीर इंजेक्शनच्या १.५ लाख बाटल्यांची दिली ऑर्डर 

भाग्यश्री भुवड

देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरलं आहे. दिवसेंदिवस करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे पालिका प्रशासनानेदेखील रुग्णांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता भासू नये यासाठी कंबर कसली आहे. पालिकेने नुकतीच रेमडेसेवीर इंजेक्शनच्या १.५ लाख बाटल्यांची (valas )ऑर्डर दिली आहे. कोरोना उपचारांत प्रभावी ठरलेल्या रेमडेसेवीर इंजेक्शनचा पुरवठा पालिकेने रुग्णालयांना पुरवण्यास सुरुवात केली आहे. इंजेक्शनची कमतरता भासू नये यासाठी पालिकेने रेमडेसेवीर इंजेक्शनच्या दीड लाख valas खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. 

मुंबईत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सुरुवात झाली आहे. या लाटेच्या प्रभावात अनेक जण येत आहेत. सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर दुसर्‍या लाटेमध्ये मुंबईत आतापर्यंत सापडलेल्या कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या नोंदीने गेल्या एका वर्षाचे सर्व रेकार्ड तोडले आहेत. रविवारी गेल्या एका वर्षातील सर्वाधिक रुग्ण सापडले असून ही संख्या ७ हजारांहून अधिक होती. गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षी कोरोना रूग्णांच्या उपचारामध्ये कोणतीही कमतरता भासू नये यासाठी पालिका बेडपासून औषधापर्यंत सर्व काही व्यवस्था करत आहे. त्याअंतर्गत, कोरोनावरील उपचारात लागणार्या रेमडेसेवीर इंजेक्शनचा साठा प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. 

"काही दिवसांपूर्वी पालिका रुग्णालयांमध्ये रेमडेसेवीर इंजेक्शनच्या ४० हजार बाटल्या पुरवल्या गेल्या आहेत. मंगळवारपर्यंत आणखी ३० हजार बाटल्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध होतील. याशिवाय इंजेक्शनच्या दीड लाख बाटल्या खरेदी करण्याची तयारी सुरू झाली आहे. या संदर्भात प्रक्रिया सुरू आहे. कोणत्याही रुग्णालयात औषधांची कमतरता भासू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. सर्व रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनही उपलब्ध होत असल्याची माहिती महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

संपादन - शर्वरी जोशी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ऑगस्टचा हप्ता 'या' तारखेपासून खात्यात जमा होणार?

“लग्न करण्याची इच्छा…” प्राजक्ता माळी 'लग्नपंचमी' नाटक पाहिल्यानंतर म्हणाली...'आज कळलं की...'

Pimpri Chinchwad Accident news : भरधाव डंपरच्या धडकेत तरुण वकील साक्षी चौभेचा मृत्यू, पिंपरीत हळहळ

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT