मुंबई

"लोककला रंग''| लोककलांचे मर्म उलगडणाऱ्या संवाद मालिकेचे सोमवारपासून प्रसारण

सकाळ न्युज नेटवर्क

मुंबई  : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत इथल्या मातीचा सुगंध असलेल्या अस्सल लोककलांचे महत्त्वाचे योगदान आहे. शेकडो वर्षांची लोकप्रबोधनाची आणि लोकरंजनाची परंपरा असलेल्या राज्यातल्या लोककलांचा इतिहास, जडणघडण, लोककलांचे पूर्वीचे आणि आजचे स्वरूप यावर प्रकाश टाकणारी "लोककला रंग' ही संवाद मालिका सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या फेसबुक पेज आणि यू-ट्युब वाहिनीवरून प्रसारित करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली. 

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने "लोककला रंग' ही संवाद मालिका 4 ते 11 जानेवारीपर्यंत रोज संध्याकाळी 7 वाजता सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई या फेसबुक पेज आणि यू-ट्युब वाहिनीवर प्रसारित होईल. लोककलांचे अभ्यासक डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या सर्व लोककलांचा थोडक्‍यात परिचय करून देणाऱ्या प्रस्तावनेने या मालिकेची सुरुवात होणार आहे. सुप्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, शाहीर देवानंद माळी, लावणी सम्राज्ञी रेश्‍मा परितेकर, प्रसिद्ध कीर्तनकार डॉ. दिलीप डबीर, भारुडकार निरंजन भाकरे, गोंधळकार भारत कदम, खडीगंमत अभ्यासक मनोज उज्जैनकर आणि दशावतार कलाकार सुधीर कलिंगण हे मान्यवर आपल्या कलेचे मर्म प्रात्यक्षिकांसह उलगडणार आहेत. ज्येष्ठ निवेदक नरेंद्र बेडेकर कलाकारांशी संवाद साधणार आहेत. कलारसिकांना या संवाद मालिकेचा आपापल्या घरी बसून आस्वाद घेता येईल, तरी संचालनालयाच्या फेसबुक पेज व यू-ट्युब वाहिनीवरून या मालिकेचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Broadcast of a series of dialogues unfolding the essence of folk art from Monday

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT