मुंबई

मुंबई : कांदिवलीत इमारत कोसळून चार वर्षीय मुलाचा मृत्यू; दोघे जखमी

निनाद कुलकर्णी

मुंबई : मुंबईतील कांदिवली पश्चिम येथे इमारत कोसळ्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका चार वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला असून, दोघेजण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या घटनेत हसिना शाह, (वय 22), शाहिदुन निसा रेन (वय 30) हे दोघे जखमी झाले आहेत. तर, नौशाद अली (वय 4 वर्षे) या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. (Building Collapsed In Kandivali Mumbai)

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मुंबईतील कांदिवली ( प. ) येथील गांधी नगर भागातील के.टी. कंपाउंड येथे जेसीबीच्या माध्यामातून गटाराचे काम सुरू होते. त्यावेळी दोन मजली इमारत कोसळली. यामध्ये एका चार वर्षीय मुलाचा जागेवरच मृत्यू झाला तर, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

सदर ठिकाणी महानगर पालिकेच्या माध्यमातून गटाराचे काम सुरू होते असे काही नागरिकांनी सांगितले तर, काही नागरिकांच्या मते हे काम नगरसेवकाच्या माध्यमातून सुरू आहे. परंतु, नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यामुळे प्रशासकीय अधिकारी त्यांचे काम पहात आहे. या सर्वामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे सदर ठिकाणी SRA च्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसनाचेदेखील काम सुरू असल्याची माहिती समजत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd ODI Live : पावसाचा खेळ अन् षटकांची संख्या झाली कमी; शुभमन गिलने टॉस जिंकून Playing XI बाबत घेतला धाडसी निर्णय

Pune News: पुण्यात १६ हजार वाहनांची नोंदणी ; गेल्या दहा दिवसांतील आकडेवारी; दिवाळीच्या मुहूर्तावर मोठी खरेदी

Khadakwasla Dam Water Level : पुणेकरांची चिंता वाढली! खडकवासला धरणसाखळीत मागील वर्षाच्या तुलनेत 5.27 टीएमसी पाणी कमी, चारही धरणांत 23.05 टीएमसी साठा शिल्लक

Gokul Government Directors : अखेर 'त्या' अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी; गोकुळवर पाच शासकीय संचालक नियुक्तीचा मार्ग मोकळा, मतदानाचाही मिळाला अधिकार

IND vs NZ 2nd ODI Live : वेलिंग्टन वन डे सामन्याला विलंब का होतोय? मॅच सुरू व्हायची वेळ झाली, पण अजून टॉसही झालेला नाही; जाणून घ्या अपडेट्स

SCROLL FOR NEXT