Bhiwandi bull fight  sakal
मुंबई

Bhiwandi: बकरी ईदसाठी आणलेल्या रेड्याचा धुमाकूळ, नागरीकांवर केला हल्ला

अहमद अन्सारी यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात रेडा मालका विरोधात गुन्हा दाखल | Ahmed Ansari registered a case against Reda Malka in Bhoiwada police station

सकाळ वृत्तसेवा

Bhiwandi News: बकरी ईद साठी आणलेला रेडा घेऊन जात असताना तो मोकळा सुटल्याने त्याने रस्त्यावरील चार जणांना जखमी केले आहे. या घटनेत जखमी महिला सुबशरा शकील अहमद अन्सारी यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात रेडा मालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील दर्गारोड येथील ताहीर कंपाउंड समोर राहणारा तारीफ फारुखी याने बकरी ईद साठी आणलेला रेडा योग्यरितीने बंदिस्त करून न ठेवल्याने तो रेडा रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर जाऊन त्यांच्या पोटात शिंग घुसवून त्यांना जखमी केले. असे या रेड्याने चार जणांना जखमी केले आहे.

त्या जखमींपैकी सुबशरा शकील अहमद अन्सारी हि २० वर्षाची तरुणी आपल्या आत्याच्या घरी चालत जात होती. ती टिपू सुलतान चौक येथील डॉक्टर इम्तियाज यांच्या दवाखान्या जवळ आली असता त्या रेड्याने तिच्या पोटात शिंग घुसवून तिला जखमी केले.

या प्रकरणी सुबशरा अन्सारी हिने भोईवाडा पोलीस ठाण्यात रेडा मालक तारीफ फारुखी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनि आनंद राठोड हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT