Bullet Train 
मुंबई

Bullet Train : अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या कामाला वेग! महाराष्ट्रातही उभारणीला वेग

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही वेग आहे. नुकतंच ठाणे खाडीतील भारतातील पहिल्या समुद्रखालून जाणाऱ्या समुद्री भुयारी रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी करार करण्यात आला. तर अहमदाबादमध्ये आत्तापर्यंत ३४२ किमी व्हायाडक्टमध्ये कामाला वेग आला आहे. 

नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य मार्गाच्या ३४२ किमी व्हायाडक्टमध्ये, २९८ किमी पाईल, २०० किमी पीएर आणि ६४ किमी व्हायाडक्ट गर्डरची कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरीत कामेही वेगात सुरू असल्याची माहितीही एनएचएसआरसीएलने दिली आहे.

तर महाराष्ट्रातील कामांसाठीची प्रक्रियाही सुरु असून नुकताच २१ किमी लांबीच्या भुयारी मार्गासाठी एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीसोबत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या २१ किमीच्या भुयारी मार्गात ७ किमी लांबीचा पहिला सागरी भुयारी रेल्वेमार्ग ठाणे खाडीत बांधला जाणार आहे. यासाठी ३ टनेल बोअरिंग मशीन आणि न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथडचा वापर केला जाणार आहे.

मुंबईतील कामाची प्रगती

मुंबई एचएसआर स्थानक एमएएचएसआर पॅकेज सी १) मार्च 2023 रोजी करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

मुंबई एचएसआर स्थानक आणि शिळफाटा दरम्यान दुहेरी मार्गासाठी बोगद्याचे अंदाजे २१ किमी बांधकाम एमएएचएसआर पॅकेज सी२साठी ८ जून रोजी करारावर स्वाक्षरी करण्यात आली. शिळफाटा आणि झरोली गावांदरम्यान गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील स्थानकांचे स्थापत्य आणि इमारतींची बांधकामे यामध्ये ३ स्थानकांचे म्हणजे, ठाणे, विरार, बोईसर एमएएचएसआर पॅकेज सी ३साठी तांत्रिक निविदा १२ एप्रिल २०२३ रोजी मागविण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT