मुंबई

महामुंबईतील नागरिकांवर नव्या करांचा बोजा ?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महामुंबईला आगामी २१ वर्षांसाठी तब्बल पाच लाख ८० हजार कोटींच्या प्रकल्पांची आवश्‍यकता आहे. आगामी दोन दशकांतील लोकसंख्येचा विचार करून मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने कृती आराखडा तयार केला आहे. वाहतूक आणि पायाभूत सुविधांवर होणारा खर्च वसूल करण्यासाठी महामुंबईतील नागरिकांवर नवे कर लागू केले जाण्याची शक्‍यता आहे.

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने २०४१ मध्ये महामुंबईतील लोकसंख्येच्या गरजेनुसार शहाराचे नियोजन करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. पायभूत सुविधा पुरवताना रोजगार निर्मितीतून राज्य सरकार, महापालिका यांनाही उत्पन्न मिळणार आहे. वाहतुकीच्या प्रकल्पांसाठी सर्वाधिक चार कोटी ९४ लाख किमतीच्या प्रकल्पांची आखणी करावी लागणार आहे. यानुसार वार्षिक २५ हजार कोटी विकासकामांसाठी खर्च होणार आहेत.

हे ही वाचा ः त्याने घरातच केली गांज्याची शेती

या पाच कोटी ८० लाखांपैकी तीन कोटी ७९ लाख निधी आठ स्थानिक महापालिका, राज्य सरकार आणि एमएमआरडीए उभारणार आहे; तर उर्वरित निधी कर्जाच्या माध्यमातून उभारला जावा, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. या कर्जाची परतफेड स्थानिक महापालिकांनी करावी, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. स्थानिक महापालिकांनी या कर्जाची परतफेड करायची झाल्यास त्यांना नवे कर लागू करावे लागतील, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.

मुंबईत सध्या सुमारे एक लाख कोटींच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे; तर पाणी पुरवठ्यासाठी सूर्या, दमणगंगा हे प्रकल्प नियोजनात आहेत. त्याचबरोबर शहरांमधील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन स्थानिक पातळीवरील रस्ते रुंदीकरण, उड्डाणपूल, नवे मार्ग बांधावे लागतील. त्याचबरोबर कचरा प्रक्रिया केंद्र आणि मलजल, सांडपाण्याचे नियोजन, प्रक्रिया असे प्रकल्प हाती घ्यावे 
लागणार आहेत.

वार्षिक खर्च
वाहतुकीच्या प्रकल्पांसाठी

२१ हजार कोटी

पाणीपुरवठा, मलजल, सांडपाणी प्रक्रिया, पर्जन्य वाहिन्या, कचरा व्यवस्थापन व इतर-
 ४ हजार कोटी

२०४१ पर्यंत वाहतुकीच्या प्रकल्पांसाठी- 
४ लाख ९४ हजार कोटी

पाणीपुरवठा, मलजल, सांडपाणी, पर्जन्य वाहिन्या, कचरा व्यवस्थापन व इतर- 
८६ हजार कोटी

महामुंबई
२०१७ ची लोकसंख्या-
२ कोटी ८८ लाख
२०४१ ची लोकसंख्या (अंदाजित)- 
३ कोटी २२ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLA Committee: आमदार समितीच्या दौऱ्याला पहिल्याच दिवशी दांडी; २७ पैकी फक्त ८ आमदार उपस्थित, अनियमितता आढळल्याने कारवाईची शक्यता

IND vs SLC XI Warm UP Match: श्रीलंकेच्या सलामीवीरांनी टीम इंडियाला रडवले; ६ गोलंदाज वापरूनही विकेट मिळेना, मानव सुथारच्या...

Thailand School Shooting : थायलंड हादरले ! आठवीच्या विद्यार्थ्याचा शाळेत अंदाधुंद गोळीबार; शिक्षकासह दोघांचा मृत्यू, १० विद्यार्थी गंभीर जखमी

Cricketer Retirement: चक्क २५ व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती! युवा वेगवान गोलंदाजाचा धक्कादायक निर्णय

Jalgaon Flyover Proposal : जळगाव महामार्गावर होणार 3 नवीन उड्डाणपूल! खासदार स्मिता वाघ यांच्या प्रस्तावाला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद, 'त्या' पुलाचीही घेतली गंभीर दखल

SCROLL FOR NEXT