Bus Accident in wada sakal
मुंबई

Bus Accident : बस आणि ट्रकचा भीषण अपघात; ४७ विद्यार्थी जखमी

Bus Accident in wada : दोघांची प्रकृती गंभीर

सकाळ डिजिटल टीम

Bus Accident in wada : बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी वाडा-मलवाडा रस्त्यावरील मलवाडा फाटा येथे घडली. यात ४७ विद्यार्थी आणि ८ प्रवासी जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या खासगी आणि शासकीय रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यात एकूण ६३ प्रवासी प्रवास करत होते.

ही बस चिंचपाडा येथून सकाळी सव्वासहाच्या सुमारास वाड्याच्या दिशेने येत होती. ५६ विद्यार्थी यात प्रवास करत होते. वाड्यापासून एक किमी अंतरावर देसई नाका येथील वळणावर ट्रकला धडकून हा अपघात झाला. सर्व प्रवाशी बेसावध असल्याने त्यांच्या तोंडाला, दातांना, डोक्याला जबर मार लागला आहे. बहुसंख्य जणांना मुका मार तसेच जखमा झाल्या आहेत.

अपघाताची माहिती समजताच वाडा ग्रामीण रुग्णालयात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. यातील तेजू घाटाळ (वय १७) या विद्यार्थिनीच्या डोक्याला व तोंडाला जबर दुखापत झाली आहे. तिला उपचारासाठी ठाणे येथे पाठवण्यात आले, तर चालक शंकर सोनकांबळे यांना वाड्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके व एस. टी. महामंडळाचे वाहतूक नियंत्रक अधिकारी विलास राठोडयांनी भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran War Victory : अमेरिकेने युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा, म्हणाले- इराणने आम्हाला मोठं गिफ्ट पाठवलं

Hotel Close Ratnagiri : रत्नागिरीत २५० हॉटेलचे ‘शटर बंद’, शिवभोजन थाळीही बंद सर्वसामान्यांची फरफट

Latest Marathi News Live Update : 'आप'चे आमदार पठाणमाजरा यांना ग्वाल्हेरमधून अटक

IPL 2026: मुंबईत सर्व IPL कर्णधारांची बैठक; इम्पॅक्ट खेळाडू, आचारसंहिता आणि नवीन नियमांची चर्चा होणार

'पुष्पा 2 मध्ये काम केल्याचा मला पश्चाताप' प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली...'मला ते पाहून धक्काच बसला...'

SCROLL FOR NEXT