bus brake failed broke protective wall and fell on cars Kalyan mumbai police sakal
मुंबई

Bus Accident : बसचा ब्रेकफेल झाला अन् संरक्षक भिंत तोडून बस कोसळली गाड्यांवर

कल्याणच्या गोदरेज हील परिसरातील घटना

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - खासगी बसचा ब्रेक फेल होऊन एका सोसायटीची संरक्षक भिंत तोडून बस थेट गाड्यांवर कोसळल्याची घटना कल्याण पश्चिमेत घडली आहे. यामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र दोन ते तीन गाड्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती खडकपाडा पोलिसांनी दिली.

कल्याण पश्चिमेच्या गोदरेज हील परिसरात गोदरेज हिल परिसरात सोसायटीच्या रहिवाशांसाठी खासगी ट्रॅव्हल्सकडून बस चालवली जाते. गुरुवारी संध्याकाळी गोदरेज हीलवरून खाली उतरत असताना या मार्गावर असणाऱ्या एका वळणावर हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. खाली येत असताना अचानक बसचे नियंत्रण सुटले आणि खाली असणाऱ्या मलबारी सोसायटीची संरक्षक भिंत तोडून ही बस तिथल्या गाड्यांवर कोसळली.

बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. सोसायटीतील 2-3 गाड्यांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती खडक पाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. एस. पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspiring Story : शेतकऱ्याच्या मुलानं नाकारल्या तब्बल 11 सरकारी नोकऱ्या; आईचं स्वप्न पूर्ण करत अखेर बनला SDM, 12 व्या प्रयत्नात श्यामनं कसं मिळवलं यश?

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

Success Story: 13 लाखांची ExxonMobilची कॉर्पोरेट नोकरी सोडून बनली आर्मी ऑफिसर! कोण आहेत NIT इंजिनीअर अथिरा सुरेश?

Latest Marathi News Live Update : उद्याच्या बैठकीसाठी आंतरवालीत या, मनोज जरागेंचं आंदोलकांना आवाहन

VAIBHAV SOORYAVANSHI: वय अवघं १५ वर्षं... पण विक्रमांची यादी मोठमोठ्या खेळाडूंना टक्कर देणारी वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत काय काय केलं?

SCROLL FOR NEXT