Raj Prakash Surve sakal
मुंबई

Mumbai Crime : बंदुकीच्या धाकावर व्यावसायिकाचे अपहरण; आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलावर गुन्हा दाखल

म्युजिक कंपनीच्या सीईओचे साथीदारांच्या मदतीने बंदुकीच्या जोरावर अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - एका म्युजिक कंपनीच्या सीईओचे साथीदारांच्या मदतीने बंदुकीच्या जोरावर अपहरण केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे आणि 10-15 जणांविरुद्ध वनराई पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी मनोज मिश्राला मुंबई विमानतळावरून पोलिसांनी अटक केली आहे.

मिश्रासोबत विमानतळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्याच्या दोन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपानुसार, मिश्रा यांनीच म्युझिक कंपनीचे सीईओ राज कुमार सिंह यांचे अपहरण करण्यासाठी आमदार पुत्र राज सुर्वे यानी कथित सुपारी दिल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार जगदीश सिंग व्यावसायिकाचे अपहरण करून आमदार कार्यालयात नेण्यात आले आणि बंदुकीच्या जोरावर काही कागदपत्रांवर सह्या करण्यात आल्या. स्थानिक पोलिसांनी हस्तक्षेप करून तक्रारदाराची सुटका करण्यात यश मिळवले. त्यानंतर अपहरण आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये 10-15 लोक जबरदस्तीने कार्यालयात घुसताना, कर्मचाऱ्यांवर हल्ला करताना आणि एका व्यक्तीला जबरदस्तीने घेऊन जाताना दिसत आहेत.

प्रकरण थोडक्यात

राजकुमार जगदीश सिंग यांचं अपहरण केल्याचा गुन्हा राज सुर्वेवर दाखल झाला आहे. ते ग्लोबल म्यूझिक कंपनीचे सीईओ आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आदिशक्ती म्यूझिक कंपनीच्या मनोज मिश्रा याला सिंग यांच्या कंपनीने 2019 मध्ये 8 कोटींचे कर्ज दिले होते. यासाठी आदिशक्ती प्रा. लि. कंपनीचे लायसन्स तारण ठेवलं होतं.

मनोज मिश्रा याने कर्जाची रक्कम कंपनीत न गुंतवता इतर ठिकाणी खर्च केली. त्यानंतर राजकुमार सिंग यांच्यावर करार रद्द करण्यासाठी दबाव टाकू लागला. दरम्यान राजकुमार सिंग यांना बुधवारी दुपारी 3.15 वाजता एक कॉल आला. सिंग यांनी कोण बोलतंय असं विचारलं असता. समोरच्या व्यक्तीने 'मै तुम्हारा बाप बोल रहा हूँ. तुम अभी इधर आ जाओ', असं उत्तर दिलं.

सिंग यांनी त्याला शनिवारी येतो असं सांगितलं. जयकुमार सिंग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कॉल कट केल्यानंतर 10-15 जण त्यांच्या कार्यालयात घुसले. त्यानंतर ते लोक सिंग यांना पश्चिम द्रुतगती महामार्गावरून युनिव्हर्सल स्कूलच्या बाजूला असलेल्या प्रकाश सुर्वेंच्या कार्यालयात घेऊन गेल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election News: महानगरपालिका निवडणुकीआधी मतदान केंद्रांत बदल; केंद्रे स्थलांतरित, कुठे आणि का? जाणून घ्या...

Jagdeep Dhankhar Health Update: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड रूग्णालयात दाखल!, ‘वॉशरूम’मध्ये पडले होते दोनदा बेशुद्ध

AMIM-BJP Alliance : अकोटमध्ये 'एमआयएम-भाजप भाऊ-भाऊ'; आमदार साजिद खान पठाण यांनी पुराव्यासह केला पर्दाफाश!

Mangalwedha ST Depot : मंगळवेढा एसटी आगाराची जिल्ह्यात 'पहिली' झेप; १० लाखांच्या उत्पन्नासह सोलापूर जिल्ह्यात अव्वल!

Latest Marathi News Live Update : सटाण्यात अनैतिक मानवी व्यापाराचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT