butter 
मुंबई

आश्चर्यजनक! मुंबईत आता बंद दुकानातून बटरचीही चोरी

सकाळवृत्तसेवा

मुंबई : देशात सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे बंद असलेली दुकाने फोडली जात असल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या असतीलच. त्यातही दारू, सिगारेट, तंबाखू तल्लफ भागवण्यासाठीच मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्याचे बातम्यांमधून समोर आले आहे. आता तर चोरट्यांनी हद्दच पार केली आहे. मुंबईतील एका दुकानातून चक्क बटरच्या पाकिटांची चोरी झाली असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. 

पोलिसांकडे आलेल्या दुकान फोडीच्या तक्रारीनुसार, आतापर्यंत दहा हजार किंमतीच्या सिगारेट, आठ हजारांची व्हिस्की, जवळपास दोन हजार रुपयांची बिअर, पाच हजारांची तंबाखू, चार हजार रुपये किंमतीच्या विडीच्या बंडलांची चोरी झाल्याची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ आता सुमारे अडीच हजार रुपयांचे बटरही चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे या सर्व घटना मुंबईच्या वेगवेगळ्या भागात केवळ 24 तासात घडल्या आहे. 

लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू सोडून अन्य दुकाने बंद आहेत. बोरीवली पूर्व येथील गोराई रोड वरील दुकानदाराने केलेल्या तक्रारीनुसार, आपले दुकान फोडून बटरची 50 पाकिटे चोरली असल्याचे म्हटले आहे. दुकानदाराने सांगितले की आपल्या दुकानातून केवळ बटरच चोरीला गेले आहे, इतर साहित्याला चोरट्यांनी हात सुद्धा लावले नसल्याचे सांगितले आहे. आपण सकाळी दुकान उघडायला गेलो, त्यावेळी आपल्याला ही चोरी झाल्याचे दिसले. 

चेंबूर येथील मद्यविक्रीच्या दुकानातून व्हिस्की तसेच बिअरची चोरी करताना चोरट्यांनी दुकानातील पाच हजार रुपये रोख सुद्धा लांबवले आहे. आपले दुकान 20 मार्चपासून बंद आहे. शेजारच्या दुकान मालकाने आपल्याला शटर उघडे असल्याचे सांगितले. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देऊन दुकान उघडले. त्यावेळी दुकानात ठेवलेले बॉक्स तसेच पैसे चोरीस झाल्याचे कळले. टिळक नगर पोलिसांकडेच सिगारेटची पाकिटे, तंबाखू तसेच दोन विडी बंडलाची चोरी झाली असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. 

खरंतर एप्रिलमध्ये घरफोडींच्या तक्रारीचे प्रमाण जास्त असते. या कालावधीत अनेकजण बाहेरगावी फिरायला जातात.  त्याचा फायदा होऊन हे घडत असते, पण सध्या लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण घरात आहे, त्यामुळे घरफोडीचे प्रमाण खूपच कमी आले. पोलिस रस्त्यांवर असल्यामुळे रस्त्यावरील गुन्ह्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे चोरट्यांनी आता बंद असलेल्या दुकानांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT