Sonu Nigam Sakal
मुंबई

Sonu Nigam Attack : "ते चुकीचंच होतं पण...; मुलाच्या गोंधळानंतर आमदार फातर्पेकरांची प्रतिक्रिया

सोनू निगमने आमदार फातर्पेकर यांच्या मुलावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध गायक सोनू निगमला धक्काबुक्की केल्याच्या आरोपामुळे चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नील चर्चेत आला आहे. मुंबईत झालेल्या एका कॉन्सर्टदरम्यान हा प्रकार घडला आहे. याबद्दल आता आमदार प्रकाश फातर्पेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तो एक छोटासा गोंधळ होता. पण जे काही झालं ते चुकीचं होतं, अशी प्रतिक्रिया प्रकाश फातर्पेकर यांनी दिली आहे. ते म्हणाले, "स्वप्नीलने त्यांच्यावर हल्ला केलेला नाही. तुम्ही जेव्हा व्हिडीओ पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जे झालं ते चुकून झालं होतं. त्याने ठरवून त्या लोकांना ढकललेलं नाही."

फातर्पेकर पुढे म्हणाले, "सेल्फी काढण्याच्या गडबडीमध्ये हा गोंधळ झाला. पण जे काही झालं ते चुकीचंच होतं. तसा तो नम्र आहे. मी त्याच्या वतीने सोनू निगम यांची माफी मागतो."

दरम्यान, घडल्या प्रकाराबद्दल सोनू निगमने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आमदार प्रकाश फातर्पेकर यांचा मुलगा स्वप्नील याने आपल्याला स्टेजवरुन खाली ढकललं आणि आपले सहकारी हरिप्रकाश आणि रब्बानी खान यांना मारहाण केली. यामध्ये हे दोघे स्टेजवरुन खाली पडले आणि जखमी झाले, असं सोनू निगमने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळले घरात, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : हडपसर, मांजरी, फुरसुंगीत जोरदार पावसाला सुरुवात

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT