Corona Vaccination Media Gallery
मुंबई

धक्कादायक! वरळीत लसीकरणाच्या बहाण्याने घरात शिरली आणि...

मुंबईच्या गोपचार हाउसिंग सोसायटीतील घटना

दीनानाथ परब

मुंबई: कोरोना लसीकरणाबाबत माहिती घेण्याच्या बहाण्याने (Vaccination purpose)घरात शिरून (criminal enter in room) चाकूच्या धाकावर 74 वर्षीय महिला (old lady) व तिच्या 9 वर्षांच्या नातवाला बांधून लुटल्याचा गंभीर प्रकार वरळीत घडला आहे. त्यामुळे घरात एकटे असताना लसीकरणाच्या नोंदणीच्या बहाण्याने कोणी घरात शिरण्याचा प्रयत्न करत असेल, तर सावधानता बाळगा. (By Vaccination purpose criminal enter in room & looted old lady incident happened in worli area)

तक्रारदार स्वाती पाटील या वरळी नाका येथील गोपचार हाउसिंग सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर राहतात. बुधवारी त्या त्यांच्या 9 वर्षाच्या नातवासह घरात एकट्याच होत्या. त्यावेळी एक महिलेने त्यांचा दरवाजा ठोकला. त्यांनी दरवाजा उघडला असता महिलेने लसीकरण झाले आहे का असे त्यांना विचारले. त्यानंतर त्यांनी लसीकरण झाल्याचे सांगितल्यानंतर स्वाक्षरी घेण्याच्या बहाण्याने या महिलेने घरात प्रवेश केला. त्यानंतर या महिलेने पाटील यांच्याकडे पाण्याची मागणी केली. ते आत आणायला गेल्यानंतर या महिलेने तिच्याकडील चाकू बाहेर काढला व चाकूच्या धाकावर या महिलेने तीन लाखांचे दागिने व 10 हजार रुपये रोख असा मुद्देमाल आपल्या ताब्यात घेतला.

त्यानंतर तिने महिला व तिच्या नातवाला बांधून तेथून पळ काढला. दुपारी याबाबची माहिती मिळाली असता, कुटुंबियांनी याबाबतची माहिती वरळी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. पुढे पाटील यांच्या जाबाबावरून याप्रकरणी वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या महिलेची काही माहिती पोलिसांच्या हाती लागली असून तिचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.सध्या कोरोनाच्या काळात सर्व नागरीक लसीकरण करण्यासाठी उत्सुक असताना आरोपी याचाच गैरवापर करून अशी कृत्य करत आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्तींना घरात घेताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे अधिका-याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''आम्ही इराणवरचे हल्ले थांबवू शकतो, पण इस्रायल...'', डोनाल्ड ट्रम्प माघार घेण्याच्या तयारीत, उद्या काय बोलणार?

Thane News: ठाण्यात नेमकं चाललंय काय! २ अल्पवयीन मुली बेपत्ता, अज्ञातांनी फूस लावून अपहरण केल्याचा संशय; गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : हडपसर-मांजरी-मगरपट्टा-महंमदवाडी परिसरात दीड तास पाऊस

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

BJP Office: चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट; संपूर्ण परिसर केला सील, भाजप नेते म्हणाले...

SCROLL FOR NEXT