Akshay Shinde 
मुंबई

Akshay Shinde Shot Dead: 'हे एन्काऊंटर म्हणता येणार नाही'; अक्षय शिंदे प्रकरणात कोर्टाला संशय, सुनावणीत काय झालं? जाणून घ्या

Akshay Shinde Shot Dead case: कोर्टाने सरकारच्या वकिलावर ताशेरे ओढले आहेत. तुम्ही जे सांगताय हे विश्वास ठेवण्यासारखं नाही असं म्हणत कोर्टाने अक्षय शिंदे एनकाऊंटर प्रकरणी संशय व्यक्त केला आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित एन्काऊंटर संदर्भात आज कोर्टासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकिलांनी सरकारची बाजू मांडली. कोर्टाने सरकारच्या वकिलावर ताशेरे ओढले आहेत. तुम्ही जे सांगताय हे विश्वास ठेवण्यासारखं नाही असं म्हणत कोर्टाने अक्षय शिंदे एनकाऊंटर प्रकरणी संशय व्यक्त केला आहे.

हे एन्काऊंटर म्हणता येणार नाही. हे एन्काऊंटर नाही असं म्हणत कोर्टानं पोलीस कारवाईवर प्रश्न उपस्थित केला आहे.ज्या पोलीस अधिकाऱ्यानं गोळी मारली.त्यानं कमरेच्या खाली गोळी ‌मारली पाहिजे होती.कितीच्या बँचचे ते‌ पोलीस अधिकारी आहेत. १९९२ च्या पोलीस बँचचे अधिकारी आहेत का? तुम्ही फायर करताना पायावर, हातावर केलं पाहिजे होतं. चार पोलीस अधिकारी असताना आरोपी कसा काय आक्रमक होऊ शकला? असा सवाल कोर्टाने केला.

कोर्टाने सुनावणी घेताना सरकारी वकिलांवर प्रश्नांचा भडिमार केला. ही घटना रहिवाशी भागात झाली का? यावर वकिलांनी उत्तर दिलं की, घटना मुंब्रा भागात झाली, एका बाजूला रहिवाशी भाग आहे, तर दुसरीकडे‌ टेकडी आहे.

आरोपीवर हल्ल्याप्रकरणी एफआयआर कधी झाला असा सवाल कोर्टाने केला. यावर वकील म्हणाले की, पहाटे ५.४० वाजता झाला. घटनेचं ठिकाण तुम्ही पुराव्यासाठी सिल केलं होतं का? आरोपीनं पिस्तुल वापरलं की रिव्हॉल्वर? पिस्तौल लोडेड होतं का? मग आरोपीनं ते‌ कसं काय घेतलं? असं कोर्टाने म्हटलं. यावर वकील म्हणाले की, पिस्तौलला लॉक नव्हतं.

यावर कोर्ट म्हणाले की, तुम्ही जे सांगताय ते सत्य मानायला कठीण आहे. साधा माणूस पिस्तौल वापरु शकत नाही. त्याला ताकद लागते.पिस्तौल लॉक का ‌नव्हतं? जर एखादा आरोपीला असं घेऊन जाता तर इतका निष्काळजीपणा का? पिस्तौलवर आरोपीच्या हाताच्या खुना असायला पाहिजेत. याबाबतचा अहवाल पुढच्या सुनावणीत सादर करा, असं कोर्टाने सांगितलं.

आरोपीनं तीन बुलेट झाडल्या. एक पोलिसाला लागली तर दुसऱ्या दोन बुलेट कुठे आहेत? या प्रश्नावर सरकारी वकील म्हणाले की,पोलिस अधिकाऱ्याला मांडीला ‌जखम झाली आहे. जखमी पोलीस अधिकाऱ्याचे हाताच्या पंज्याचे नमूने आजच घ्या, असं कोर्टाने सांगितलं आहे. कोर्टाने यावेळी सर्व सीसीटीव्ही ताब्यात घेण्यास सांगितलं आहे. तसेच ,आरोपीला नेत असताना बुरखा घालण्यात आला नव्हता, असं देखील कोर्ट म्हणालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT