मुंबई

मध्य रेल्वेवर पायाभूत कामासाठी काही लोकल रद्द; टिटवाळा येथील पादचारी पुलाच्या कामासाठी पॉवर ब्लॉक

कुलदीप घायवट

मुंबई :  मध्य रेल्वे मार्गावरील टिटवाळा येथील पादचारी पुलाचे गर्डर बसविण्यासाठी शनिवारी रात्रकालीन ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, कसारा आणि सीएसएमटी दिशेकडील लोकलच्या वेळापत्रकात बदल होऊन काही लोकल रद्द केल्या जातील. टिटवाळा स्थानकातील पादचारी पुलावर क्रेनच्या सहाय्याने 4  गर्डर बसविण्यात येणार आहेत. परिणामी, शनिवारी रात्री 11.25  ते पहाटे  2.25  पर्यंत खडवली -आंबिवली अप रेल्वे मार्गावर, टिटवाळा येथील रिव्हर्सल रेल्वे मार्गावर ब्लॉक असेल.  सीएसएमटी दिशेकडे जाणारी शेवटची लोकल आसनगाव येथून रात्री  10.10  वाजता सुटेल. सीएसएमटी करिता कल्याण येथून  रात्री 10.06  वाजता सुटणारी लोकल ठाण्यापर्यंत चालविण्यात येईल.

19 डिसेंबर रोजी रद्द केलेल्या कसारा दिशेकडील लोकल 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सायंकाळी  8.56  वाजता सुटणारी आसनगाव लोकल.

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री  9.20  , रात्री  10.00 ,
रात्री 10.51  , रात्री 11.20 आणि रात्री  11.44  वाजता सुटणाऱ्या टिटवाळा लोकल.

19 डिसेंबर रोजी रद्द केलेल्या सीएसएमटी दिशेकडील लोकल 

सीएसएमटी करिता टिटवाळा येथून  रात्री  7.47  वाजता, रात्री  8.21 ,
रात्री  9.00   वाजता आणि रात्री  10.06  वाजता सुटणाऱ्या  लोकल.

ठाण्याकरिता टिटवाळा येथून  रात्री  11.14  वाजता  सुटणारी लोकल.

ठाण्याकरिता आसनगाव येथून रात्री  11.08  वाजता सुटणारी लोकल.

Cancellation of some locomotives for infrastructure work on Central Railway in mumbai

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT