Maharashtra Police Bharti News Updates Sakal
मुंबई

Mumbai : पोलीस भरती प्रक्रिये दरम्यान उमेदवाराचा मृत्यू

गणेश उगले असे या तरूणाचे नाव असून 1600 मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केली असता तो खाली कोसळला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई पोलीस दलातील भरतीची प्रक्रिये दरम्यान सांताक्रुझच्या कलिना येथील कोळे कल्याण मैदानात एका उमेदवाराचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. मैदानी चाचणीदरम्यान चक्कर आल्याने हा तरुण कोसळला.

गणेश उगले असे या तरूणाचे नाव असून 1600 मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केली असता तो खाली कोसळला. यानंतर गणेश उगलेला सांताक्रूझ येथील व्हीएन देसाई रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत गणेश उगले 27 वर्षाचा असून मूळचा वाशिमचा आहे.

गणेश उगले मुंबईत आपल्या चुलत भावासोबत गुरूवारी आला होता. मुंबई बाहेरून येणाऱ्या उमेदवारांसाठी शासनातर्फे केलेल्या तात्पुरती व्यवस्थेत दोघांनी गुरूवारी रात्री मुक्काम केला. शुक्रवारी सकाळी लवकर उठून गणेश उगले भरती प्रक्रियेत सहभागी झाला.

या घटनेनंतर पोलिसांनी त्याच्याकडे गणेशसंदर्भात चौकशी केली असता सकाळपासून त्याची प्रकृतीबाबत कोणतीच तक्रार नसल्याची गणेशच्या चुलत भावाने पोलिसाना माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT