महाड : बाजारात आलेले कॅनरी चिबूड. 
मुंबई

कॅनरी चिबूडचे ग्राहकांमध्ये कुतूहल.. नक्की काय आहे हे चिबूड

सकाळ वृत्तसेवा

महाड (बातमीदार) : अ आणि क जीवनसत्त्वाचा भरपूर स्त्रोत असलेले कॅनरी चिबूड रायगड जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहे. महाड बाजारपेठेतही या फळांनी आपले पाय पसरले आहेत. पिवळ्या धम्मक रंगाचे हे आकर्षक चिबूड ग्राहकांसाठी कुतूहलाचा विषय बनले आहेत. सध्या या फळाकडे ग्राहकांचा फारसा कल नसला, तरीही येत्या काळात हे फळही लोकप्रिय होईल, असा अंदाज फळविक्रेत्यांना आहे. 

रायगड जिल्ह्यात गावठी चिबूडांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. पेण, इंदापूर, गोरेगाव गावांमधून गावठी चिवडाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गावठी चिबूड मऊसर व चवीला गोड असतात. आता परदेशातून येणाऱ्या कॅनरी चिबूडाने बाजारपेठेमध्ये आगमन केले आहे. बाजारात त्याचा केरळी चिबूड असा अपभ्रंशही केला जातो. जिल्ह्यातील बाजारपेठेत दाखल झालेले हे चिबूड दिसायला सुंदर असल्याने ग्राहकांचा कुतूहलाचा विषय झाला आहे. जपान, दक्षिण कोरिया, मॅंक्‍सिकोमध्ये यांची लागवड होते आणि त्यांना विशेष मागणी असते. 

भारतातही काही वर्षांपासून या फळांनी पाय पसरले आहेत. या महिन्यात जिल्ह्यात या चिबूडाची सुमारे सहा-सात टन आवक झाली आहे. वाशी व पुणे येथून या फळांचा पुरवठा होतो. बाहेरून पिवळ्या रंगाचा आणि आतून गुलाबी व पांढरा रंगाचा हा चीबूड असतो. या चिबूडाचे वैशिष्ट्य असे की, हा चवीला चांगला आहे आणि थोडा कडक आहे. तो टिकाऊ असल्याने भविष्यात त्याची मागणी वाढण्याची शक्‍यता असल्याचे विक्रेता अब्बास शेख याने सांगितले. या चिबूडाची बाजारामध्ये सध्याचे किंमत ६० रुपये किलो आहे. ग्राहकांसाठी हे फळ नवीन असल्याने सध्या ग्राहक फळांची केवळ चव घेत आहेत आणि सावधानतेने फळ विकत घेत आहेत. या फळाचा परिचय झाल्यावर हळूहळू ड्रॅगन फ्रुट, किव्ही, तसेच इतर परदेशी फळांप्रमाणेच मागणी वाढेल, असा विश्वास विक्रेत्यांना आहे. 

या फळाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सर्वाधिक क व अ जीवनसत्त्व आहे. त्यामुळे जीवनसत्त्वाच्या फायद्यामुळे या फळांचा वापर बाहेरील देशांमध्ये अधिक प्रमाणात केला जातो. 

गावठी चिबूड २० रुपयांपासून मिळत आहे. तसेच ते पारंपरिक फळ असल्याने नागरिकांना आवडते. या चिबूडाची चव चांगली असली, तरी किंमत जास्त आहे. किंमत कमी झाल्यास याचीही विक्री वाढेल. 
- विजय पालेकर, ग्राहक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

Tata Sons Boardroom: बोर्डरूममध्ये टाटा सन्सचे ‘बंड’; सूत्रे पुन्हा चंद्रशेखरन यांच्याकडे, नोएल टाटांची नाराजी कायम

Agriculture Corruption: कृषी खात्यामध्ये भ्रष्टाचाराचे उदंड ‘पीक’; राज्यात १६५ अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी सुरू

Marathi News Live Updates : राज्य मंडळाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावी ८ फेब्रुवारीपासून, तर दहावी १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात पावसाचा अंदाज; मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT