मुंबई

Success Story : आर्थिक परिस्थिती नव्हती, पण स्वप्नं मोठी होती.. कॅप्टन झोयाच्या मदतीने मुंबईची 'स्लम गर्ल' झाली पायलट!

'भारत की बेटी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या झोया अग्रवालने एका मुलीचं पायलट होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

Aishwarya Musale

आकांक्षा पुढती, जिथे गगन ठेंगणे असे म्हटले जाते. तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगातील कोणतेही अवघड काम करु शकता. हे धारावीत रहाणाऱ्या नद्रत हीने करुन दाखविले आहे. मुलीला पायलट व्हायचे होते, परंतु तिच्या आईची इच्छा ती इंजिनियर व्हावी अशी होती.

मुलीने परीक्षेतही चांगली कामगिरी केली. परंतु आर्थिक परिस्थिती नव्हती. पण असं म्हणतात की जर तुम्ही प्रयत्न केलेत आणि तुमच्यात क्षमता असेल तर कोणीतरी तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानावर नक्कीच घेऊन जाईल. आणि नेमकं तेच झालं.

धारावीतील नदारतसोबत असे घडले आहे. महिला पायलट म्हणून प्रसिद्ध असलेल्या झोया अग्रवालने एका मुलीची मदत करुन तिचे पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली आहे.

महिला पायलट आणि 'भारत की बेटी' म्हणून प्रसिद्ध असलेल्या कॅप्टन झोया अग्रवाल यांनी एका मुलीचे पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली. महाराष्ट्रातील धारावीच्या झोपडपट्टीतील मुलीने स्वतःच्या संघर्षाची आणि कॅप्टन झोया अग्रवालच्या मदतीची कहाणी सांगितली.

मीडियाशी बोलताना मुलीने सांगितले की, माझ्या आईची इच्छा होती की मी इंजिनीअरिंग करावे पण मला पायलट व्हायचे आहे. परंतु आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यामुळे माझे प्रशिक्षण शक्य झाले नाही. मी प्लाइंग स्कूलची प्रवेश परीक्षा पास झाले तरीही आर्थिक परिस्थिती नसल्याने मला नाकरण्यात आले. 

ती पुढे म्हणाली की, झोया अग्रवालला जेव्हापासून पंतप्रधान मोदींकडून 'भारत की बेटी' पुरस्कार मिळाला, तेव्हापासून मला वाटत होते की त्या मला मदत करतील आणि मी त्यांना माझे गुरू म्हणून स्वीकारले.

कॅप्टन झोया म्हणाल्या - 'ही फक्त सुरुवात आहे'

दरम्यान, मुंबईतील एका झोपडपट्टीतील मुलीचे पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत केल्याबद्दल एअर इंडियाच्या पायलट कॅप्टन झोया अग्रवाल यांनी सांगितले की, ही फक्त सुरुवात आहे. त्या पुढे म्हणाल्या की, मला प्रत्येक मुलीचे स्वप्न वास्तवात आणायचे आहे, जिच्या मनात मनात काहीतरी करण्याची आग आहे.

त्या म्हणाल्या की, हे क्षेत्र खूप वेगाने वाढत आहे, येत्या 14-15 वर्षांत ते दुप्पट होणार आहे. मुलींची या क्षेत्राला गरज आहे. मुलींना केवळ संसाधनांच्या कमतरतेमुळे निराश होऊ देऊ शकत नाही. असे त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 2nd Test: भारताविरुद्ध स्टब्सचं शतक ६ धावांनी हुकलं, पण द. आफ्रिकेने विजयासाठी ठेवलं भलंमोठं लक्ष्य

Viral VIdeo : लग्नातून नोटांचा हार घेऊन पिकअप व्हॅनने पळाला चोर, नवरदेवाने स्पायडर मॅन बनून शिकवली जन्माची अद्दल, थरारक व्हिडिओ

Smriti Mandhana Video : "लग्न थांबवण्याचा निर्णय स्मृती मानधनाचा नाही पलाशचा!", 'अंदरकी बात' पलाशच्या आईनेच सांगितली...

Tata Sierra Launch : 22 वर्षानंतर लेजन्ड कारची पुन्हा एंट्री; टाटाने लॉन्च केली बहुप्रतीक्षित Sierra, किंमत अन् दमदार फीचर्स पाहा

सचिन तेंडुलकरच्या प्रेमात होती 'या' मराठी सुपरस्टारची बायको; प्रपोज करण्याचाही केलेला प्लॅन पण अभिनेता मध्ये आला अन्...

SCROLL FOR NEXT