adipurush movie sakal
मुंबई

Adipurush Movie : आदिपुरुष बनवतांना काळजी घ्यायला हवी होती - मोती सागर

आदिपुरुष प्रदर्शीत झाल्यानंतर समाज माध्यमांमध्ये या चित्रपटावर टिकेची झोड उठवण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - आदिपुरुष प्रदर्शीत झाल्यानंतर समाज माध्यमांमध्ये या चित्रपटावर टिकेची झोड उठवण्यात येत आहे. दूरदर्शनवर गाजलेल्या रामायण या प्रसिध्द सिरीयलच्या दिग्दर्शकापैकी एक असलेले मोती सागर यांनी रामायण चित्रपट करतांना आदिपुरुषच्या टिमने काळजी घ्यायला पाहीजे होती असे म्हटले आहे. पीटीआयशी बोलताना त्य़ांनी हे विधान केलं.

ओम राऊत यांनी दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटावर सर्वत्र टिका होत आहे. चित्रपटातील वाईट व्हिएफएक्स आणि संवादावर आक्षेप घेण्यात आले आहेत. चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांच्यावर हनुमान यांच्या संवादावरुन टिकेची झोड उठवली गेली आहे. मी ट्विटर आणि माध्यमातून काही संवादाबद्दल ऐकल आहे. हे संवाद लिहितांना त्यांनी काळजी घ्यायली पाहीजे होती असे मोती सागर म्हणाले. मोती सागर यांनी १९८७ मध्ये दूरदर्शनवरील रामायण या गाजलेल्या सिरीयलसाठी वडील रामानंद सागर, भाऊ प्रेम सागर यांच्यासोबत काम केले होते.

लेखकाने सिनेमाकडे सामान्य माणसाला आकर्षित करण्यासाठी कदाचित अशे संवाद लिहीले असावे असे ते म्हणाले. या चित्रपटात हनुमानाच्या तोंडी असलेले संवादावर वाद निर्माण झाला आहे.हा चित्रपटाला सुपरहीरोसारखा बनवण्य़ाचा प्रयत्न निर्मात्यांचा असेल. नवी पीढीला हे संवाद मान्य होईल अस त्यांचा विचार असावा असा विचार त्यांनी केला असावा अस सागर यांनी सागींतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack Video: पत्नीवर पिटबुलचा हल्ला, वाचवायला गेलेल्या पतीलाही चावा; दीड मिनिटात २६ वेळा चावले, हातासह पायावर सर्जरीची वेळ

Dagdusheth Ganpati Temple: ‘दगडूशेठ गणपती ट्रस्ट’ला फरासखाना ठाण्याची जागा मिळणार, पुणे पोलिसांकडून गृह विभागाकडे प्रस्ताव सादर

'वचन दिले तू मला' मालिकेतून अभिनेत्याची एक्झिट; मिलिंद गवळींनी शेअर केली खास पोस्ट ,म्हणाले- खूप त्रास

Shravan Calendar 2026: कॅलेंडर कशाला उघडताय? श्रावणातल्या सगळ्या सणांची यादी इथेच वाचा

Latest Marathi News Live Update : २०१८ च्या भागामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही - सरन्यायाधीश

SCROLL FOR NEXT