मुंबई

बाळांतपणासाठी अदिवासी महिलेला झोळीत टाकून नेले; मुंबईच्या जवळपासच्या अदिवासी पाड्यांमध्ये अद्यापही रस्तेच नाही

मुरलीधर दळवी


मुरबाड ः मुरबाडपासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या तळ्याची वाडी येथे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने या आदिवासी वाडीतील एका महिलेला बाळंतपणासाठी चक्क झोळी करून मुरबाड येथे आणावे लागल्याची घटना उघडकीस आली आहे.  चंद्रकला रघुनाथ झुगरे असे या महिलेचे नाव आहे.

या महिलेला 17 जुलै रोजी झोळी करून आठ किमी अंतरावर मुरबाडला आणले होते. उशीर झाल्यामुळे नैसर्गिकरीत्या बाळंतपण होऊ शकेना. त्यामुळे एका खाजगी हॉस्पिटलमध्ये सिझर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी 30000 रुपये कर्ज काढुन खर्च करण्याची वेळ कुटुंबियांवर आली.  त्यानंतर टाके काढण्यासाठी काल बुधवारी ता 29 जुलै रोजी झोळीत बसवून पुन्हा मुरबाड येथे आणावे लागले.

मुरबाड जवळील मानिवली ग्रामपंचायत हद्दीतील ही वाडी आहे तीनही दिशांना बारवी धरणाच्या पाण्याचा वेढा तर चौथ्या बाजूला जंगल त्या जंगलातील दगड धोंडे, कच्चा रस्ता व चिखलामुळे वाहन जात नाही. मुरबाड वेहेऱ्याची वाडी, वडाची वाडी, मानिवली असा रस्ता आहे.  या रस्त्यावर खाजगी रिक्षा जातात त्यामधून वडाची वाडी जवळ उतरून डोक्यावरून रेशन, बाजार 3 किमी पर्यंत आणायचे. आजारी व्यक्ती, गरोदर बाईला झोळीतून न्यावे लागते. रात्री अपरात्री कधीही! अशा यातना सहन करत हे आदिवासी तेथे रहात आहेत. 

बारवी धरणाची उंची वाढविल्यामुळे मागच्यावर्षी पासून पावसाळ्यात तळ्याची वाडी येथील ग्रामस्थांना हा त्रास सहन करावा लागत आहे. मंडळाचे कार्यकारी अभियंता जयवंत बोरसे सांगतात बारवी धरणाच्या पाण्यामुळे तळ्याची वाडी येथे जाणारा पारंपारिक रस्ता बाधित झाला नसल्याने नवीन रस्ता तयार करण्यासाठी कोणतीही उपाय योजना केलेली नाही. 

तर तळ्याची वाडीकडे जाणारा रस्ता वन विभागाच्या हद्दीतून जात असल्याने त्याबाबत रस्ते विभागाचे उप अभियंता यांचेशी बोलून कार्यवाही करतो असे मुरबाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रमेश अवचार यांनी सांगितले. आदिवासी लोकांची सोय करावी म्हणून श्रमिक मुक्ती संघटनेच्या नेत्या इंदवी तुळपुळे यांनी बारवी धरणाची उंची वाढविल्यामुळे उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. जीवन जगणे असह्य झालेल्या मुरबाड तालुक्यातील कोळे वडखळ व तळ्याची वाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने जुन महिन्यात ही याचिका दाखल केली होती. पण ही याचिका जनहित याचिका म्हणून मुख्यन्यायाधिश यांचेकडे वर्ग करण्यात आल्याचे व त्यावर शुक्रवारी 31 जुलै रोजी न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे तुळपुळे यांनी सांगितले

उन्हाळा पावसाळा आम्हाला तीन किलोमीटर जंगलातून पायी प्रवास करावा लागतो आजारी माणूस असो किंवा बाळंतपणासाठी जाणारी महिला. त्यांना डोली करूनच न्यावे लागते, कधी कधी महिलांची प्रसूती रस्त्यातच होते. या बाबत अधिकाऱ्यांना निवेदन देऊन पक्का रस्ता करण्याची मागणी केली आहे. पण कोणी लक्ष देत नाही 
अनंता विठ्ठल झुगरे
ग्रामस्थ तळ्याची वाडी

------------------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT