case against former corporator Woman sexual harassment Police investigating mumbai esakal
मुंबई

Mumbai Crime : माजी नगरसेवकावर लैंगिक शोषणाचा महिलेकडून आरोप; पोलिसांकडून तपास सुरू

लग्नाच्या बहाण्याने लैंगिक छळ करून तिला गर्भपात करायला लावल्याचा आरोप महिलेने केला

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील एका माजी नगरसेवक आणि राजकीय पक्षाच्या नेत्याविरुद्ध एका 29 वर्षीय महिलेने वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसात लैंगिक छळ केल्याचा आरोप करत पोलीस तक्रार दाखल केली आहे. महिलेने आरोप केलेला व्यक्ती हा मुंबई महापालिकेचा माजी नगरसेवक असून एका राजकीय पक्षाचा सदस्य आहे.

आरोपीने लग्नाच्या बहाण्याने लैंगिक छळ करून तिला गर्भपात करायला लावल्याचा आरोप महिलेने केला आहे. पुढे या गोष्टीची वाच्यता करू नये या साठी त्याने महिलेला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागतील असे धमकावल्याचा आरोप केला आहे. महिलेच्या आरोप नुसार तिने तीन वर्षांपूर्वी राजकीय पक्षात सदस्य म्हणून रुजू झाल्याचे सांगितले.

तेव्हापासून आरोपी तिच्यावर वाईट मनशा ठेवून असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी वडाळा पोलिसांनी हा तपास अंटोप हील पोलिसांकडे हस्तांतरित केला आहे. या प्रकरणी अँटोप हील पोलीस अधिक तपास करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Railway Close : मुंबई-पुणे रेल्वे १५ तासांहून अधिक काळ ठप्प; सेवा केव्हा सुरू होणार?

ZIM vs BAN, ODI: झिम्बाब्वेने केला बांगलादेशचा गेम! चुरशीच्या लढतीत धूळ चारत मालिकेत घेतली आघाडी

Sahitya Kesari Mahakavya Karandak : शुभम आव्हाळेचा ‘साहित्य केसरी महाकाव्य करंडक २०२६’वर विजय; ‘पावसा येऊन जा’ कवितेला राज्यस्तरीय मानाचा बहुमान

Civic Failure: दोन कोटींचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष निष्प्रभ; पावसात तुंबलेल्या पाण्याची, नदीपात्रातील धोक्याची माहितीच गायब

Latest Marathi News Live Update: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा रद्द

SCROLL FOR NEXT