Dr. Tatyarao Lahane google
मुंबई

Tatyarao Lahane : आदेशाशिवाय शस्त्रक्रिया केल्याप्रकरणी डॉ. लहाने दोषी? चौकशी समितीचा ठपका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी डोळ्यांच्या काही शस्त्रक्रिया आदेशाशिवाय केल्याचा ठपका ठेवला असल्याची माहिती समोर येत आहे. जे. जे. रुग्णालयातील तीन सदस्यीय चौकशी समितीने हा प्राथमिक निष्कर्ष काढल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र यावर अधिकृतपणे बोलायला मात्र चौकशी समितीचे सदस्य तयार नाहीत.

डॉ. लहाने यांनी हे आरोप फेटाळले असून योग्य चौकशी न करता माझ्यावर आरोप लावले जात असल्याचे डॉ. लहाने यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

प्राथमिक अहवालानुसार डॉ. लहाने यांनी बऱ्याचशा शस्त्रक्रिया कोणत्याही परवानगीशिवाय किंवा प्रशासकीय आदेशाशिवाय केल्या असल्याचे या समितीच्या अहवालात सांगण्यात आले असल्याची माहिती आहे. राज्य सरकारच्या अंधत्व निवारण मोहिमेंतर्गत समन्वयक असताना डॉ. लहाने यांनी या शस्त्रक्रिया केल्याचे बोलले जात आहे.

तत्कालीन नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांना यासंदर्भात खुलासा करण्यासही समितीने सांगितल्याची माहिती आहे. हा चौकशी समितीचा अहवाल अधिष्ठात्यांकडे पाठवला गेल्याचेही सांगण्यात आले.

दरम्यान, याविषयी जे. जे. रुग्णालय समूहाच्या अधिष्ठात्या डॉ. पल्लवी सापळे यांच्याशी ‘सकाळ’ने संपर्क साधल्यावर, मी सध्या दिल्लीत आहे; चौकशी पूर्ण झाली असल्यास हा गोपनीय अहवाल मी वाचल्यानंतर मला भाष्य करता येईल असे सांगितले.

राजीनाम्यानंतरही चौकशी

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आम्ही राजीनामे दिले. माझी कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नाही. सर्व शस्त्रक्रिया नियमाच्या चौकटीत राहून केल्या आहेत. मार्डचा विषय हा वेगळा होता. त्यानंतरही हा विषय थांबलेला नाही, याचा अर्थ यामध्ये राजकारण सुरू झाले आहे. या विभागातील गरीब रुग्णांसाठी सेवा विस्कळित झाली त्याचे काय?

- डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ नेत्रविकारतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT