Mumbai Crime Esakal
मुंबई

Mumbai Crime: कुर्ल्यात सापडलेल्या सुटकेसमधील महिलेच्या हत्येच्या प्रकरणाचा झाला उलगडा; लिव्ह इन रिलेशनमध्ये...

मुंबईतील कुर्ला येथे सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईतून एक हादरवणारं प्रकरण समोर आलं होतं. मुंबईतील कुर्ला येथे सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होता. रविवारी सकाळी सुटकेसमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला . तिचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. दरम्यान या सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या हत्येच्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

या प्रकरणी गुन्हे शाखा कक्ष ५ ने महिलेच्या प्रियकराला अटक केली आहे. संशयावरून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दोघे लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी प्रियकराला अटक करण्यात आली आहे. रविवारी मेट्रो कंस्ट्रक्शन साइटवर सुटकेसमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. कुर्ला पश्चिमेकडील सी एस टी ब्रिज, शांतीनगर बस स्टॉप जवळील, मेट्रो कन्स्ट्रक्शन साइटवर मृतदेह सापडला होता.

रविवारी 19 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सीएसटी रोड, शांती नगर येथे ही सुटकेस आढळून आली होती. मेट्रो रेल्वेचं बांधकाम सुरू असलेल्या बॅरिकेडच्या जवळ एका व्यक्तीला ही सुटकेस दिसली. त्याला संशय आल्याने त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली होती.

सुटकेसची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ही सुटकेस उघडली असता, त्यात मृतदेह आढळून आला. या महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. महिलेच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा दिसलेल्या नव्हत्या. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

Narayangaon Protest: मिलिंद एकबोटे यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्याचा नारायणगावात तीव्र निषेध, कायदेशीर कारवाईची मागणी

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT