मुंबई

कलाकार भिन्न ठिकाणी, पण दिसणार एकाच ठिकाणी! वाचा बातमी सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या आक्रमणातून दूरचित्रवाणी मालिकाही सुटलेल्या नाहीत. प्रेक्षक घरात असतानाही जुन्याच मालिका दाखवणे अनेक वाहिन्यांना भाग पडत आहे. मात्र आता मालिकेतील कलाकार आपल्याच घरातून स्वतंत्र शूटिंग करुन मालिकेचे नवे भाग तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ये रिश्ता क्या कहता है आणि ये रिश्ते है प्यार के या स्टार प्लस वाहिनीवरील मालिकेतील कलाकारांनी घरातून शूटिंग करुनच नवे भाग करण्यास तयार सुरुवात केली आहे. आता झी टीव्हीवरील गुड्डन तुमसे ना हो पायेगा मालिकेबाबतही हाच प्रयोग होत आहे. कोरोनामुळे मालिकेचे शूटिंग पूर्णपणे थांबल्यामुळे हा निर्णय झाला आहे. 
मालिकेतील कलाकार, दिग्दर्शक तसेच सर्वच बॅक स्टेज साठी हा एक नवा प्रयोग आहे. मालिकेतील कलाकार मोबाईल फोनच्या मदतीने स्वतःच्या रोलचे शूटिंग करीत आहेत. मालिकेतील प्रत्येक पात्राने पाठवलेले शूटिंग एकत्रित करण्यात येणार आहे, पण त्यावेळी ते कलाकार एकाच ठिकाणी आहेत असा भासही तयार करण्यात येणार आहे. 

ड्डन तुमसे ना हो पायेगा या मालिकेसाठी शूट झालेला या प्रकारच्या पहिल्या सीनमध्ये सर्व कुटुंबाचा सहभाग होता. त्यामुळे आव्हान सोपे नसते. अभिनय हा जशी अॅक्शन असते तशीच रिअॅक्शनही असते. सहकारी कलाकार समोर नसताना रिअॅक्शन करण्याचे काम जास्त आव्हानात्मक आहे. अर्थातच सहकलाकाराची एखाद्या वाक्यावर काय प्रतिक्रिया असेल हे लक्षात घेऊन त्यानुसार हावभाव व्यक्त करावे लागत आहेत. 
अर्थात सध्या तरी हा एक प्रयोग म्हणून पाहिला जात आहे. त्याचा एकंदरीत परिणाम काय होतो, याबाबत निर्माते तसेच वाहीनी चर्चा करतील आणि त्यानंतरच निर्णय घेतली. या प्रयोगास संमती मिळाल्यास आठवड्यास नवे पूर्ण पाच भाग तयार करण्याचीही तयारी केली जात आहे. मात्र यासाठी कलाकारांनाच आपली वेशभूषा तसेच मेक-अप करण्याचेही आव्हान असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT