file photo 
मुंबई

सावधान : किराणा दुकानांत मिळतोय निकृष्ट माल 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने फक्त जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री सुरू आहे. परंतु, उपनगरांतील अनेक किराणा दुकानांमधून दर्जेदार, ब्रॅंडेड वस्तू गायब झाल्या असून, खाद्यपदार्थ आणि डिटर्जंट निकृष्ट व बनावट असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. 


राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये नागरिकांना किराणा आणि जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी 7 ते सायंकाळी 5 अशी वेळ ठरवून दिली आहे. त्यामुळे जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी किराणा दुकानांप्रमाणे मोठ्या सुपरमार्केटसमोर नागरिक सुरक्षित अंतर ठेवून रांगा लावत आहेत. परंतु, उपनगरांतील अनेक दुकानांतून नागरिकांच्या नियमित वापराच्या ब्रॅंडेड वस्तू मिळत नसून, खाद्यपदार्थ, डिटर्जंट आणि अन्य वस्तू निकृष्ट दर्जाच्या व बनावट असल्याचे आढळत आहे. 

तक्रार कुठे करायची? 
बाजारात अनेक वस्तूंचा पुरेसा साठा नसल्यामुळे नागरिकांना कधी न ऐकलेल्या नावांच्या वस्तू नाईलाजास्तव विकत घ्याव्या आणि वापराव्या लागत आहेत. या निकृष्ट वस्तूंबाबत तक्रार कुठे करायची, असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्याचप्रमाणे बनावट व निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांमुळे आरोग्यावर विपरित परिणाम होण्याचीही दाट शक्‍यता आहे. 

किराणा दुकानांतील खाद्यपदार्थ बनावट किंवा निकृष्ट असल्यास अन्न व औषध प्रशासन कारवाई करते. असे प्रकार आढळल्यास सोमवारपासून कारवाई केली जाईल. डिटर्जंट आणि इतर वस्तू निकृष्ट किंवा बनावट असल्यास पोलिस विभागाने कारवाई केली पाहिजे. 
- शशिकांत केकरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT