Documentary by Indrani Mukherjee sakal
मुंबई

Indrani Mukherjee Documentary : नेटफ्लिक्सवर इंद्राणी मुखर्जीचा माहितीपट प्रदर्शित न करण्यासाठी सीबीआयची सत्र न्यायालयात धाव

२०१५ साली गाजलेल्या शीना बोरा हत्याकांडावर आधारित 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी बरीड ट्रुथ' हा माहितीपट नेटफ्लिक्स वर २३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - २०१५ साली गाजलेल्या शीना बोरा हत्याकांडावर आधारित 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी बरीड ट्रुथ' हा माहितीपट नेटफ्लिक्स वर २३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या हत्याकांडातील मुख्य आरोप इंद्राणी मुखर्जी हिची माहिती व हत्येच्या तपासाचा उलगडा या महितीपटात दाखवण्यात येणार असून सीबीआयने या महितीपटालाच आक्षेप घेतला आहे.

माहितीपट प्रदर्शित करू नका अशी मागणी सीबीआयने केली असून न्यायालयात तशी याचिका दाखल करण्यात आली आहे.

डॉक्युमेंटरीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करत सीबीआयने केलेल्या अर्जावर विशेष कोर्टाचे न्या. एस पी नाईक निंबाळकर यांच्या समोर आज (ता.१७) सुनावणी झाली. सरकारी वकील सी जे नांदोडे यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणातील आरोपींवर असलेला खटला पूर्ण होत नाही तोपर्यंत माहिती पटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणावी.

न्यायालयाने याची गंभीर दखल घेत नेटफ्लिक्स सह इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले व या प्रकरणावरील सुनावणी २० फेब्रुवारी पर्यंत तहकूब केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास सरकार उलथवेन...मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा..

Dream11 ची माघार, मग टीम इंडियाचा स्पॉन्सर कोण? Toyota सह तगडी कंपनी शर्यतीत; आशिया चषकापूर्वी BCCI ला लागणार लॉटरी?

Latest Marathi News Updates: गणरायाच्या आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यात "ड्राय डे" घोषित

गोविंदाच्या पत्नी सुनिताच होतं दुसऱ्या अभिनेत्यावर क्रश, कबुली देत म्हणाली...'गोविंदा त्याच्यासारखा दिसायचा म्हणून...'

Adventure ट्रेकिंगसाठी शोधताय खास ठिकाण? अरुणाचल प्रदेशातील 'या' आयो व्हॅली ट्रेकचा अनुभव घ्या!

SCROLL FOR NEXT