मुंबई

वसई विरार शहरावर सीसीटिव्हीची नजर; महत्त्वाच्या ठिकाणी बसवेल 145 कॅमेरे 

प्रसाद जोशी

वसई ः गुन्हा करून गुन्हेगार पळाल्यानंतर त्याचा त्वरित तपास लागावा.त्यांच्या मुसक्‍या आवळून गुन्हेगारीला आळा घालता यावा, म्हणून वसई विरार शहरात एकूण 145 सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. "एक कॅमेरा शहरासाठी' ही योजना राबविण्याकरीता मीरा भाईंदर वसई विरार आयुक्त सदानंद दाते यांनी आदेश दिले आहेत, त्यानुसार शहरात कॅमेरे लावण्यात आले आहेत याचे उदघाटन उपयुक्त संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

वसई, वालीव, नालासोपारा, नवघर माणिकपूर, अर्नाळा सागरी, विरार, तुळींज सात पोलीस ठाणे हद्दीतील दुकाने, हॉटेल, बॅंक, पेट्रोलपंप, सोसायटी, ऑफिस, आस्थापना व इतर संस्था येथे नागिरांची भेट घेवून त्यांना या योजनेचे महत्त्व पटवून देण्यात आले. समाधान फाउंडेशन, हनुमान मंदिर, टेम्पो अशोशिएशन, कौल फाउंडेशन , केजीएन यांच्यासह अन्य संस्थांनी कॅमेरा बसवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 
वसई तालुक्‍यात औदयोगिक व नागरी वस्ती मोठया प्रमाणात असून सराफांची दुकाने लुटणे, घरफोडी आणि त्यातच धूम स्टाईलने येणारे सोनसाखळी चोर यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे आरोपींना वेळीच जेरबंद करता यावे म्हणून एक कॅमेरा सुरक्षेचा उपक्रम पोलिसांनी हाती घेतला व त्याला वसईतील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या उपक्रमामुळे गुन्हेगारीवर मात करण्यास मदत होईल असे मत पोलीस दलाकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

गुन्हेगारीवर प्रतिबंध व गुन्हयाचा तपास करताना वसई विरार शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे तपासाला निश्‍चितच उपयोगी ठरतील. शहरातील मुख्य तसेच अंतर्गत मार्गावर, वर्दळीच्या ठिकाणी कॅमेरे असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहेत अद्याप कुठे सीसीटीव्ही लावावेत याचाही विचार सुरु आहे. 
- संजय पाटील -
उपायुक्त , वसई 

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: पॅट कमिन्सच्या जागेवर इशान किशन होणार SRH चा कर्णधार? काय आहेत नवे अपडेट्स?

'सनई चौघडे'चा पहिला भाग प्रेक्षकांना आवडला की नाही? नेटकऱ्यांना आठवली 'ही' जुनी मालिका, म्हणतात- जोडी भारीये पण...

Latest Marathi News Live Update : युद्धाचा फटका सोलापुरात; प्रसिद्ध ‘प्रीती डायनिंग’मध्ये नाश्ता बंद

'Dhurandhar' चित्रपट पाहून अडचणीत सापडला वैभव सूर्यवंशी... म्हणाला, माझी फेव्हरिट मुव्ही... सोशल मीडियावर गदारोळ

Gold Investment: HSBC चा पहिला Gold ETF लॉन्च! गुंतवणूकदार दूर जात असताना मोठी एंट्री; सोन्यात गुंतवणुकीची नवी संधी?  

SCROLL FOR NEXT