मुंबई

स्मशानभूमी कामगार संसर्गामुळे हादरले; सुरक्षा रक्षक आणि मृत्यू नोंदणी करणाऱ्यांमध्ये दहशत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करणारे कामगार, सुरक्षा रक्षक, मृत्यू नोंदणी करणारे कारकून असे सर्वच कामगार कोरोना संसर्गाच्या भीतीने हादरले आहेत. कोरोनाबाधित सुरक्षा रक्षकांचे प्रमाण वाढत आहे. मनुष्यबळ कमी असल्यामुळे महापालिका मुख्यालयातील सुरक्षा रक्षकांना कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार होणाऱ्या चंदनवाडी स्मशानभूमीत पाठवले जात आहे.

अंत्यसंस्कारांसाठी येणारे कोरोनाग्रस्तांचे मृतदेह वाढल्यामुळे स्मशानभूमीत कामगार, सुरक्षा रक्षक आणि मृत्यू नोंदणी करणारे कारकून दहशतीखाली आहेत. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, रुग्णांचा आकडा 35 हजारांवर, तर मृतांचा आकडा हजारावर गेला आहे. कोरोनाच्या रुग्णांवर महापालिका व खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. रुग्णांची दिवसरात्र काळजी घेणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत.

महापालिकेच्या मुख्यालयात 100 शस्त्रधारी व बिगर शस्रधारी सुरक्षा रक्षक तैनात असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यावर  मुख्यालयातील सुरक्षा रक्षकांना कस्तुरबा रुग्णालयात कर्तव्यावर पाठवण्यात येत होते. आता या सुरक्षा रक्षकांना चंदनवाडी स्मशानभूमीत सुरक्षेसाठी पाठवले जात आहे. महापालिकेचे सुमारे 60 सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 15 ते 17 सुरक्षा रक्षक महापालिका मुख्यालयातील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : 'मी महादेवाचा अवतार, तुला चांगलं करिअर घडवायचं असेल तर..'; वासनांध खरातचा शिक्षण घेणाऱ्या युवतीवर अत्याचार, कॅप्टनविरोधात सातवा गुन्हा

IPL 2026 Marathi News: चेन्नई सुपर किंग्सचं चाहत्यांसाठी मोठं सरप्राईज... ऋतुराजने सांगितली ओपनिंग जोडी, आता धमाल येणार

Akkalkot News: तीर्थक्षेत्र अक्कलकोटमध्ये दर गुरुवारी मांस विक्री बंद; नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टींचा घोषणा; आजपासून अंमलबजावणी!

Vaibhavwadi Kolhapur Railway Project : वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा ‘डीपीआर’ तयार : रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची माहिती

Bangladesh Bus Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेली बस नदीत उलटली, २३ जणांचा मृत्यू, थरारक अपघाताचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT