मुंबई

देशभरात रक्ताचा तुटवडा भासतोय; रक्तदानाची शिबिरे भरवण्याचे केंद्राचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशभरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा भरुन काढण्यासाठी सर्व राज्यांनी शिबिरे भरवावी, अशी सुचना केंद्र सरकारने केली आहे. यापूर्वी 14 एप्रिलला महाराष्ट्र सरकारने रक्तदानाचे आवाहन केले होते.  त्यानंतर अनेकांनी रक्तदान केले;  मात्र‌ लॉकडाऊन वाढल्याने आता पुन्हा‌ रक्ताची तजवीज पुन्हा करावी लागणार आहे.‌ यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन जाधव यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याना पत्र लिहीले आहे. 

थॅलेसेमिया, सिकल सेल, अॅनेमिया, हेमोफेलिया या रुग्णांना सतत रक्ताची‌ आवश्यकता लागते. त्यांना‌ कायम रक्तपुरवठा करावा लागत असल्याने रक्त शिबिरे भरवण्याचे आवाहन केंद्राने केले आहे. माध्यमांद्वारे जनतेला हे आवाहन करावे, अशी सुचनाही मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे.

रक्तसाठ्याची‌ माहीती‌‌ रक्तकोष पोर्टलवर नियमित अपडेट करण्याबाबत‌ सर्व‌ रक्तपेढ्यांना सुचना द्यावी, कोणताही गरजू रक्ताशिवाय माघारी फिरता‌‌ कामा नये, त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमाचे पालन करुन रक्तदानाची शिबिरे भरवावी, असे पत्रात म्हटले आहे. रक्त पुरवठा करण्याच्या ठिकाणापर्यंत रक्त वाहून नेण्याचे कामही जबाबदारीने करावे. मोबाईल रक्तदान वाहनाचा वापर करुन दात्याच्या सोयीनुसार रक्तदान स्वीकारु शकता; मात्र रक्त तपासणीच्या‌ नियमांनीच रक्तदान स्वीकारावे, असेही पत्रात म्हटले आहे.

Center appeals to states to fill blood shortage camps across the country

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT