मुंबई

सलून्स आणि ब्यूटी पार्लरबद्दल महत्त्वाचा निर्णय...

सकाळवृत्तसेवा

केंद्राने लॉक डाऊन पुन्हा एकदा २ आठवड्यांसाठी वाढवला आहे. अशात देशातील ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही नियमांसह काही उद्योग आणि व्यवसाय सुरु करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. यामध्ये वाईन शॉप्स, ई-कॉमर्स यांचा देखील समावेश आहे. अशात न्हावी समाजाकडून देखील केशकर्तनालय सुरु करण्याची सातत्याने मागणी होत होती. अशात केंद्राने सलून्स आणि ब्यूटी पार्लर्स बद्दल महत्त्वाचा निर्णय घेतलाय. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नोटिफिकेशन प्रमाणे 4 मेपासून सुरु होणाऱ्या लॉक डाऊनच्या तिसऱ्या भागात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सलून उघडण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. 

ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सलून सुरु करण्यास परवानगी जरी दिली असली तरीही सलून चालवणाऱ्यांना काही महत्त्वाच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. सलून दुकानांमध्ये किंवा ब्यूटी पार्लर्समध्ये दोन ग्राहकांमध्ये जवळजवळ सहा फुटांचं अंतर ठेवणं बंधनकारक असणार आहे. पुढील नियम म्हणजे दुकानांमध्ये एका वेळी पाच पेक्षा अधिक माणसं नसावीत. 

जगभरातील उदाहरणं पाहता सलून्समुळे कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या अनेक घटना घडल्यात. मुख्यत्त्वे सलून्स आणि पार्लरमध्ये मोठ्या प्रमाणात चेहऱ्याशी संपर्क येतो. अशात एकाच्या चेहऱ्यावर वापरण्यात आलेला टॉवेल दुसऱ्याच्या चेहऱ्यावर वापरल्याने कोरोनाचा संसर्ग झाल्याची ही उदाहरणं आहेत. त्यामुळे आता रेड झोन वगळता केंद्राने परवानगी जरी दिली असली तरीही सलून्स आणि पार्लरमधून कोरोना संसर्ग फैलावणार नाही याची काळजी घ्यायलाच लागेल. 

central government gave permission to keep barber shops open in green and orange zone

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Market Yard : भाजीपाला व्यापारी व सभापती यांच्यात जोरदार वाद, कोल्हापूर बाजार समितीमध्ये प्रकार; नेमकं काय प्रकरण?

Pro Kabaddi 12: यू मुंबावर युपी योद्धाज पडले भारी! पराभवामुळे टॉप-४ ची संधीही हुकली

Ayurvedic Tips for Heart: हृदयविकाराचा झटका येऊच नये यासाठी काय करावे? वाचा आयुर्वेद काय सांगत

Mumbai News: तिसऱ्या मुंबईसाठी सिडकोसारखे धोरण! बाधितांना मोबदल्यात भूखंडही देणार

Video : अर्जुन करणार सायलीच्या आई - वडिलांची डीएनए टेस्ट ! "अरे इतका स्लो वकील कसा असू शकतो ?" प्रेक्षक भडकले

SCROLL FOR NEXT