Corona Vaccination Sakal
मुंबई

Mumbai News : कोरोना लसिकरणानंतर मृत्यूच्या वाढत्या घटनांकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष

अवेकन इंडिया मुव्हमेंट या संस्थेने व्यक्त केली चिता.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - कोरोना लसिकरणानंतर मृत्यूच्या वाढत्या घटनांकडे केंद्र सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, याबाबत अवेकन इंडिया मुव्हमेट या संस्थेने चिता व्यक्त केली आहे. लसीमुळे मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची विनंती त्यांनी केद्र सरकारला आणि लस निर्मिती कंपन्यांना केली आहे.

अवेकन इंडिया मुव्हमेंट या संस्थेतर्फे मुंबई मराठी पत्रकार संघात आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी डॉ. अमितवबॅनर्जी, डॉं ललिल आनंदे, डॉ. अभय चेन्दा, अॅड. निलेश ओझा, प्रा. भास्करन रामन आम्बर कोईरी, योहन तेंग्रा आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्र सरकारने या लसीबाबत गांभिर्याने घ्यावे, देशातील नागरिकांच्या जीविताला त्यामुळे धोका आहे. याबाबत फेरविचार न करता सार्वजनिक आरोग्य धोरणे पुढे ढकलली तर त्याचा परिणाम देशव्यापी आंदोलनात होईल अशी भिती अवेकन इंडिया मुन्हमेंटचे फोरोज मिठिबोरवाला यांनी केली आहे. डॉ. अमितल बॅनर्जी आणि डॉं ललिल आनंद यांनी व्यक्त केली आहे.

मिठीबोरवाला यांनी पुढे म्हटले आहे की, आमची संस्था कोविशिल्ड लसीच्या दुष्परिणामाबाबत चिंता व्यक्त करीत आहे. कोविशील्ड लस घेतल्यानंतर मरण पावलेल्या ३३ वर्षीय फ्रंटलाइन कामगार स्नेहल लुनावत यांच्या मृत्यूनंतर मे २०२१ मध्ये केंद्र सरकारला याची माहिती मिळाली.

लस उत्पादनाशी संबंधित राष्ट्रीय एईएफआय समितीने त्याच्या मृत्यूची माहिती केंद्र सरकारला दिली. तरीही केंद्र सरकार लस उत्पादकांकडून याबाबत खुलासा मागविण्यात अयशस्वी ठरले, अशी माहिती अवेकन इंडियाने दिली.

नुकसान भरपाईची मागणी

- कोरोना लसीमुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबातील सदस्यांना केंद्र सरकार आणि लस उत्पादकांनी नुकसान भरपाई द्यावी.

- बाधितांना न्याय देण्यासाठी जलदगती न्यायालये स्थापन करावीत

- संबंधित अधिका-यांना याप्रकरणी जबाबदार धरण्यात यावे आणि त्यांना दोषी अधिका-याना शिक्षेची तरतूद करावी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घाटकोपरमध्ये फूटपाथवर झोपलेल्यांना कारची धडक, २ तरुणींसह तिघेजण ताब्यात; कारचालक तरुण रिक्षाने झालेला फरार

"मला तो मुलगा आवडला" लग्नाबद्दल रिंकूचा खुलासा; म्हणाली "मी अतिशय भावनिक.. "

Latest Marathi News Updates : धनगरांना ST आरक्षण न दिल्यास वर्षा बंगल्यावर मेंढरं सोडू

Gadchiroli News: एक वर्षापासून लपवला नगरसेविकेचा राजीनामा; कोरचीच्या नगराध्यक्षांचा प्रताप, पद वाचवण्यासाठी लढवली वेगळीच शक्कल

Kolhapur Airport Emergency : कोल्हापूर विमानतळावर ‘इमर्जन्सी लँडिंग’, काय होती मेडिकल इमर्जन्सी; पुढे काय झाल?

SCROLL FOR NEXT