मुंबई

केंद्र सरकारने गरिबांना लस मोफत द्यावी; राजेश टोपे यांची मागणीम

मिलिंद तांबे



मुंबई  : राज्यातील दारिद्य्ररेषेखालील नागरिकांना कोरोना लस मोफत द्या, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरणार आहोत. याबाबत केंद्राने योग्य निर्णय न घेतल्यास राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले. 
गरिबांना मोफत लस देण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरणार आहोत. दारिद्य्ररेषेखालील नागरिकांना कोरोनाची लस मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन कर्मचारी, दीर्घकालीन आजार असलेले 50 वर्षांवरील रुग्ण अशा जवळपास तीन कोटी जणांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. उद्या (ता. 6) आरोग्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत गरिबांना मोफत लस देण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरणार असल्याचेही ते म्हणाले.

लॉकडाऊनमध्ये गरिबांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे गरिबांना लशीच्या दोन कुप्यांसाठी 500 रुपये लादणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने हा खर्च उचलावा. केंद्र सरकारने हा खर्च केला नाही तर राज्य सरकारच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. राज्य सरकारच्या राज्याच्या अखत्यारित येणाऱ्या लोकांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असा विश्‍वासही टोपे यांनी व्यक्त केला. 

तीन जिल्ह्यांत ड्राय रन 
राज्यात 28 आणि 29 डिसेंबरला देशातील चार राज्यांत कोरोना लसीकरणाचे ड्राय रन झाल्यानंतर संपूर्ण देशभरात ड्राय रन होणार आहे. त्यानुसार 2 जानेवारीला राज्यातील तीन जिल्ह्यांत लसीकरणाचे ड्राय रन झाल्यानंतर आता 8 जानेवारीला सर्व जिल्ह्यांत लसीकरणाची रंगीत तालीम होणार असल्याचे टोपे यांनी म्हटले. या ड्राय रनसाठी लसीकरणासाठी यंत्रणा कितपत सज्ज आहेत, याचा आढावा घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले. 

हवाई वाहतुकीवरील बंदी कायम 
कोरोनाच्या नव्या प्रकाराबाबत राज्य सरकार सजग आहे. रुग्णांच्या संपर्कातील इतर व्यक्तींचा शोध सुरू आहे. ब्रिटनमधून आलेल्या प्रत्येकाला संस्थात्मक विलगीकरणात ठेवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. आयसीएमआरने सांगितलेला प्रोटोकॉल आपण पाळत आहोत. ब्रिटनच्या हवाई वाहतुकीवरील बंदी कायम ठेवण्यात येणार असून, त्यासाठी केंद्र सरकारला पत्र पाठवणार आहोत. लोकांनी जागरूक राहावे, घाबरून जाऊ नये; परंतु जनतेने काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

The central government should provide free covid19 vaccines to the poor Demand of Rajesh Tope

------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT