amit shah mumbai visit today sakal
मुंबई

Mumbai : केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्यात नियमांची पायमल्ली

अमीत शहांच्या दौऱ्यात नियम डावलून दहा वाहनांचा ताफा

प्रशांत कांबळे ,

मुंबई : राज्य शासनाच्या अधिसुचनेनुसार महाराष्ट्रात दौऱ्यावर येणाऱ्या प्रत्येक केंद्रिय मंत्र्यांना प्रत्येकी एकच वाहन उपलब्ध करून देण्याचा नियम आहे. मात्र, हा नियम डावलून, मुंबई दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्री अमीत शहा यांच्या ताफ्यात राजशिष्टाचार विभागाकडून तब्बल दहा वाहने देण्यात आल्याचे समोर आले आहे.

राज्याच्या दौऱ्यावर आलेल्यांना त्यांच्या पदानुसार आणि आवश्कतेनुसार शासकीय परिवहन सेवेतील वाहन दिले जाते. यामध्ये केंद्रीय मंत्र्यास एक वाहन देण्याचा नियम आहे. मात्र हा नियम मोडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यासाठी राजशिष्टाचार विभागाने दहा गाड्या पुरवल्या आहेत.

शहा यांच्या दौऱ्यात ऑन रेकॉर्ड एकच वाहन दाखवण्यात आले आहे. मात्र शासकीय परिवहन सेवा कार्यालयाने मात्र, तब्बल दहा वाहने दिल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांना फोन केला असता त्यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही. तर राजशिष्टाचार विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या वर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

राजकीय पक्षाच्या वाहनांना फीटनेस प्रमाणपत्र

राजशिष्टाचार विभागाकडून राज्य अतिथींना वाहन दिले जाते. आवश्यकता पडल्यास कंत्राटी पद्धतीने अधिक वाहने उपलब्ध करुन दिले जातात. पहिल्यांदाच एका राजकीय पक्षाने आपल्या स्तरावरून तिन खासगी वाहने दिली असून, या वाहनांना शासकीय परिवहन सेवा कार्यालयाने फिटनेस प्रमाणत्र दिले आहे. ही वाहने केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ताफ्यात असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Net Worth: जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! अडाणींची एका दिवसात 84,500 कोटींची कमाई; अंबानी किती नंबरवर?

Shahaji Raje Bhosale Samadhi : शहाजीराजे भोसले यांच्या कर्नाटकातील समाधीवर बसवली भव्य ४५० किलोची मेघडंबरी; पुणेकराचे अभिमानास्पद कार्य

चिरंजीव ‘अश्वत्थामा’ची कथा आता रंगभूमीवर ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

पत्नी आवडत नाही म्हणून मित्रांना ५० हजारात विकली, पुढे १० दिवस मित्रांनी....; गुजरातमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Live Update : छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेर आंदोलन

SCROLL FOR NEXT