Central Railway QR Code Tickets
esakal
मुंबई : लोकल किंवा रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीस दिसताच क्यूआर कोड स्कॅन (Central Railway QR Code Tickets) करून तात्काळ तिकीट खरेदी करण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने (Indian Railway) मोठा निर्णय घेतलाय. काल गुरुवारपासून क्यूआर कोडद्वारे तिकीट विक्री सेवा कायमस्वरूपी बंद करण्यात आलीये.
त्यामुळे आता प्रवाशांना स्थानकातील तिकीट खिडकीवर रांगेत उभे राहूनच तिकीट घ्यावे लागणार आहे. मात्र, यूटीएस अॅपद्वारे स्थानकाबाहेरून तिकीट खरेदी करण्याची सुविधा सुरूच राहणार आहे. सन २०१६ मध्ये प्रवाशांना तिकीट खरेदीची सुलभ सुविधा मिळावी म्हणून रेल्वे प्रशासनाने यूटीएस ॲप सुरू केले होते. यामध्ये तीन टक्के परतावा मिळत असल्याने प्रवाशांचा प्रतिसादही उत्स्फूर्त होता.
फलाटावर ठेवलेल्या क्यूआर कोड स्कॅन करून लगेच तिकीट घेण्याचीही सोय होती; पण याच सेवेतून मोठ्या प्रमाणावर गैरवापर सुरू झाला. तिकीट तपासनीस दिसल्यावरच अनेक प्रवासी क्यूआर कोड स्कॅन करून तिकीट काढू लागले. इतकेच नव्हे, तर मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांतील क्यूआर कोड यादी इंटरनेटवर सहज उपलब्ध असल्याने प्रवाशांनी त्याचा गैरफायदा घेतला.
या प्रकारामुळे रेल्वेला आर्थिक फटका बसत असल्याने क्यूआर कोड तिकीट विक्री बंद करण्याची शिफारस मध्य रेल्वेने रेल्वे मंडळाकडे केली होती. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर काल गुरुवारपासून ही सेवा बंद करण्यात आली. सध्या क्यूआर कोड स्कॅन केल्यास यूटीएस अॅपमध्ये “सेवा बंद आहे” असा संदेश दिसतो, असे मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेने आधीच ही सेवा बंद केली होती.
आगामी काळात स्थानकातील तिकीट खिडकी परिसरात डिजिटल स्क्रीन बसवून बदलणारे (डायनॅमिक) क्यूआर कोड सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे. मात्र, ही व्यवस्था लागू होईपर्यंत क्यूआर कोड तिकीट विक्री सुरू होणार नाही. तोपर्यंत प्रवाशांना तिकीट खिडकी, एटीव्हीएम (Automatic Ticket Vending Machine), जेटीबीएस (Jan Sadharan Ticket Booking Sevak) या पर्यायांचा वापर करावा लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.